नाशिकरोड|प्रतिनिधी| समस्त पृथ्वी तळावरील मानवी जीवनावर आलेला महाभिषण काळ म्हणजे 'कोरोना' महामारी या काळाचा उल्लेख होऊ शकेल. या काळात मानवी जीवनावर संकट येऊन अनेक निष्पापांच्या जीवावर बेतले. अनेक जण कुटुंब सोडून गेले. मनुष्य हे जग सोडून गेला, तरी त्यांच्या आठवणी मात्र चिरंतन राहतात. याच आठवणींना उजाळा देण्याचे महत्त्वाचे कार्य उपनगर मधील 'युगांतर सोशल फाउंडेशन' या सेवाभावी संस्थेने सुरू करून समाजात नवा पायंडा पाडला, असेच म्हणावे लागेल.
*वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल*...........
*चालता बोलता देव तुम्हास नेईन*........
*माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल*.....
*त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल*.....!!
असा संदेश देऊन कोरोना काळात प्रभाग १६ मधील दिवंगत झालेले कै. किसन पुरकर, चंद्रकला पुरकर यांच्या आठवणींना त्यांच्या नावे वृक्षारोपण करून उजाळा देण्यात आला. *प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर)* या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उपनगर मधील श्रमनगर मध्ये पुरकर कुटुंबियांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कै. किसन पुरकर, चंद्रकला पुरकर यांच्या आठवणींनी पुरकर कुटुंबियांचे डोळे पाणावले होते.
युगांतर सोशल फाउंडेशनने हा जो उपक्रम प्रभागात सुरू केला, तो निश्चितच वाखण्याजोगा आहे. येणाऱ्या नवपिढीला संस्कारक्षम होऊन प्रेरणादायी राहील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा मानसन्मान यातून उजागर होऊन नवी दिशा येणाऱ्या पिढीला त्यातून मिळू शकेल, असा आशावाद समस्त पुरकर कुटुंबियांनी व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. यावेळी संजय पुरकर, उज्ज्वला पुरकर, अभिषेक पुरकर, वैष्णवी पुरकर, शिवानी कापसे, सुमनताई संधान, पूनम संधान, आदित्य संधान यासह कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांचे आभार संजय पुरकर यांनी मानले.
शांतीपार्क सोसायटी
शांतीपार्क सोसायटी येथील दिवंगत कै. बाबुराव गुरव, दत्तात्रय भावसार, शैलेश भावसार, रामचंद्र मुरलीधर वाणी, राजन दिवेकर, शैला दिवेकर, मल्लिकर, शिवरामकृष्ण अय्यर, पुष्पा कडलग यांचे कोरोना काळात निधन झाले. यासर्वांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी वंदना सुभाष ठाकूर, सुभाष गिरीधर ठाकूर, अनंत मधुकर मुळे, मालती शाम पाटील, रुपाली गुरव, मालती बाबुराव गुरव, सोमनाथ गुरव, वैभव सुभाष ठाकूर, सचिन सुभाष ठाकूर, व्यंकटेश अय्यर, रमेश अय्यर आदी शांतीपार्क सोसायटी मधील रहिवासी उपस्थित होते.
अक्षरधारा सोसायटी, आनंद नगर
अक्षरधारा सोसायटी, आनंद नगर मधील कै. अशोक संभाजी सातपुते, प्रमिला मधुकर बारी, छाया सुभाष भावसार यांचे कोरोना काळात दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आनंद नगर उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रमेश भट, राजेंद्र राणे, सुदाम जोशी, पारू अशोक सातपुते, प्राची इनामदार, वीरेंद्र भावसार, हेमंत बारी आदी आनंद नगर मधील रहिवासी उपस्थित होते.


