नाशिक| आदिवासी दुर्गम भागातील खेडलेगावचा रहिवाशी विठ्ठल पवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली असून साई कॉम्पिटिशन अकॅडमीचा तो विद्यार्थी आहे, त्याला संचालक प्रा. एन. जी. वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस क्षेत्रातील निवडीबद्दल त्यांचे पंचक्रोशीसह सर्वत्र अभिनंदन होत आहे.
तो नाशिक अकॅडमीचा विद्यार्थ्यां आहे, सुरुवातीला पोलीस भरतीत निवड झाली होती, यावर्षी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली, कालपासून नाशिक येथे ट्रेनिंगला हजर झाले आहे. अंगी जिद्द, चिकाटी बाळगत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्याने यश संपादन केले. तसेच इतरांसमोर उदाहरण घालून दिलं. सुरुवातीला आदिवासी वस्तीगृहात शिक्षण घेऊन महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये निवड झाली, त्यानंतर अहोरात्र मेहनत करून आणि साई कॉम्पिटिशन अकॅडमीच्या मार्गदर्शनाने पीएसआयपदी निवड झाली आहे. सध्या हा विद्यार्थी ट्रेनिंग घेत आहे. अशा आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची पोलीस क्षेत्रात निवड झाल्याने आजच्या तरुणांना ती प्रेरणादायक आहे. विविध भरती आणि स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन आणि प्रवेशासाठी साई कॉम्पिटिशन अकॅडमीशी संपर्क साधण्याचे आवाहन संचालक प्रा. एन जी वसावे यांनी केले आहे.
ध्येय निश्चित केल्यास हमखास यश
या निवडीमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले छोट्या छोट्या आदिवासी गावातील विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षांमध्ये मागे नाही. प्रतिकूल परिस्थिती असो किंवा साधन सामग्रीची कमतरता त्याचा त्यांच्या ध्येयावर कधीच परिणाम दिसला नाही, मेहनतीच्या जोरावर त्यांनी गाठलेले लक्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रा. एन जी वसावे
संचालक, साई कॉम्पिटिशन अकॅडमी

