नाशिक | जिल्ह्यातील पर्यटकांच आकर्षण असलेल भावली धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाले असून सकाळी ७३ क्यूसेस ने विसर्ग करण्यात आला तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसासाठा ६१.१३ टक्क्यांवर गेल्याने दिलासा मिळाला असून, त्यामुळे नाशिककरांवरचे पाणी कपातीचे संकट टाळणार आहे.
नाशकात ही गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. धरणांची पाणी पातळी कमी झाल्याने नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट आले. दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. हे संकट पुढे आणखी गडद होण्याची चिन्हे दिसत असतानाच वरून राजाने कृपा केली. नाशिकमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकला पाणी पुरवठा करणारे गंगापूरधरण ६१.१३ टक्के भरले आहे. त्यामुळे तुर्तास तरी नाशिककरांवरचे पाणी कपातीचे संकट टळणार आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे १२५ जणांचा मृत्यू
राज्यातही गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल मदत व पुनर्वसन विभागाने काल दि. २४ जुलै रात्री ९.३० वाजता जाहीर केला, दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे. एकूण ११२ मृत्यू झाले असून ३२२१ जनावरांचे मृत्यू झाला आहे.एकंदर ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत.
