दिल्ली|भारोत्तोलक मीराबाई चानूने आज महिलांच्या 49 किलो गटात रौप्य पदक जिंकून टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. मीराबाईने एकूण 202 किलो वजन उचलले, ज्यात स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो होते.
मूळच्या माणिपूरच्या 26 वर्षीय मीराबाईने 2018 मध्ये पाठीला झालेल्या दुखपतीनंतर खूप काळजी घेत आपला सराव केला. पहिले पदक मिळवून देत संपूर्ण देशाच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मीराबाईचे तिच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तिचे अभिनंदन होत आहे.
