नाशिक| पर्यावरणाचा असमतोल पावसाचा लहरी पणा मानवाने केलेले निसर्गावर अतिक्रमण व त्यामुळे घडणाऱ्या दुर्घटना जर बघितल्या व ब्रम्हगिरी सह्याद्रीचा चालू असलेला लढा याचाच एक भाग म्हणून सांय. ७ वाजता गोदावरी पूजन व आरतीमध्ये सर्व पर्यावरण प्रेमी संस्था आणि संघटनांनी सहभागी होऊन माता गोदावरीला विनवले की, गोदामाई तु सदा अविरल निर्मल वहावी ही अशी इच्छा प्रकट केली.
अर्धा पावसाळा निघुन चालला अजुन ही तुझे पात्र अपुरेच आहे.म्हणूनच डोंगर वाचले तर नदी वाचेल आम्ही सर्व पर्यावरण प्रेमी डोंगर,गड़,किल्ले प्रेमी एकत्र येवुन तुला आश्वासीत करीत आहोत तु ही निरंतर अविरल निर्मल सौंदर्य आम्हाला दे यासाठी नाशिक मधील पर्यावरण प्रेमी संस्था संघटना गोदावरी गटारीकरण विरोधी मंच,कपिला नदी संवर्धन समिती, वालदेवी निर्मूलन समिती, अस्था-अनादी फॉन्डेशन, आदी संस्थानी प्रातिनिधिक स्वरुपात पुजा करुन नाशिकला ही पर्जन्यवृष्टी व्हावी व गोदामाता दुथडी भरुन वाहत जावी अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे, योगेश बर्वे, उदय थोरात, योगेश कापसे , स्वप्नील घीया, वैशाली चव्हाण, विनोद संसारे, प्रकाश बेळे, मनपाचे जमदाडे सह आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
