नाशिक| कोणत्याही रेशन कार्डधारकांची तक्रार येणार नाही, तो वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना महिला बालकल्याण समिती अध्यक्ष आ. सरोज अहिरे यांनी काल येथे दिल्या. नाशिक तालुका पुरवठा दक्षता समीतीची बैठक महिला व बालकल्यान समिती अध्यक्ष आ. सरोज अहिरे तथा अमदार अध्यक्षतेखाली तहसिल कार्यलयात झाली त्यावेळी बोलत होत्या.
चांगल्या प्रतीचे धान्य गोदामातून उचल करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी दुकानदार प्रतिनिधींनी आपल्या अडचणी निवेदनाद्वारे अवगत करुन दिल्या, करोनाने निधन झालेल्या दुकानदारांना शासनाकडून विमा कवच अथवा आर्थिक मदत मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार अनिल दौडे, पंचायत समीती गटविकास अधिकारी सारिका बारी, पुरवठा निरिक्षक स्वप्नील थोरात, वसंत केदार . मौंडे भाऊसाहेब, ढवळू फसाळे, पंचायत समिती सदस्य . निवृती महाराज कापसे, मारूती बनसोडे, माधव गायधनी , दिलीप नवले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
