नाशिक| राज्यात जेष्ठ नागरीकांच्या विविध समस्या निवारणासाठी राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फौडेंशन पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १४५६७ सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जेष्ठ नागरीकांनी गरज भसल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय भारत यांच्या मार्फत देशातील जेष्ठ नागरीकांच्या तक्रार निवारण करीता ही राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. याकरीता जिल्हा स्तरावर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून, जिल्ह्यातील नागरीकांना कोणतीही वृध्द व्यक्ती बेघर असल्याचे अढळल्यास त्यांना वेळेत मदत मिळावी या करीता तसेच जेष्ठ नागरीकांना काही समस्या किंवा तक्रार करावयाची असल्यास सदर हेल्पलाईन क्रमांक १४५६७ यावर संपर्क साधावा. असेही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी कळविले आहे.
