मोखाडा| ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालघर जिल्ह्यात आदिवासी आघाडीच्या वतीने सर्व तालुका व मंडळ निहाय जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हरिश्चंद्र भोये, प्रदेश कार्यकारणी आदिवासी आघाडी सचिव डॉ हेमंत सावरा, संघटन सरचिटणीस संतोष जनाठे,आदिवासी आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जिप सदस्य सुरेखा थेतले, सरचिटणीस सुजित पाटील, सुशील औसरकर तसेच जिल्हा पदाधिकारी,मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
आदिवासी आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्व ठिकाणी आदिवासी दिन कार्यक्रम संपन्न व्हावे यासाठी आदिवासी आघाडी पालघर जिल्हा अध्यक्ष मिलिंद झोले तसेच जिल्हा सरचिटणीस अभिजित देसक,दैनत लहरे व विजय जवले यांनी प्रयत्न केले.
