नाशिक| नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर रास्त भाव दुकानदार संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सभासदांना भेडसावणाऱ्या समस्या आणि अडचणीबाबत चर्चा झाली.
त्यामध्ये कमीशन वाढ व करोनानाने निधन झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना आर्थिक मदत आणि विमा कवच शासनाकडून मिळवून देणे तसेच संघटनेतर्फे ही शक्य होईल तेवढी मदत करण्यावर एकमत झाले. शासनाने तात्काळ मदत करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे, वामनराव खोसकर, गणपत डोळसे पाटील, संघटनेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. निवृत्ती महाराज कापसे, पुंडलीक साबळे, लालू अचारी, अरुण बागडे, प्रकाश नाठे, दिलीप नवले, अशोक बोराडे, सागर भगत आदी उपस्थिती होते. मान्यवरांच्या उपस्थितीत मयत दुकानदार यांचे वारसदार दिनकर खेडूलकर, गोटीराम दिव, आणि हेंमत तरवारे यांना प्रत्येकी ३०,००० रु. आर्थिक मदत देण्यात आले.

