नाशिकरोड |प्रतिनिधी| उपनगर येथील युगांतर सोशल फाउंडेशन संपर्क कार्यालयात प्रभागातील नागरिकांना रेशनकार्ड वाटप करण्यात आले. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना टप्प्याटप्प्याने रेशनकार्ड वाटप करण्यात आले. कोविड-१९ चे सर्व नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.
व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जोंधळे, प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवि पगारे (सर), विनोद चौधरी, पंढरीनाथ काळूनगे हे मान्यवर उपस्थित होते. जवळपास ४५० ते ५०० नागरिकांना रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बोलताना श्री रवि पगारे (सर) म्हणाले की, रेशनकार्ड हे अत्यंत उपयुक्त सरकारी दस्तऐवज असून भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी ते महत्वाचे राहणार आहे.
शासनाच्या नियमानुसार २०१९ पूर्वीचे रेशनकार्ड धारकांना रेशनदुकानातून सवलतीच्या दरात धान्य मिळेल. नवीन रेशनकार्ड धारकांना सहा महिन्यानंतर धान्य मिळू शकेल. प्रभागातील उत्तर भारतीय जनतेला याचा लाभ निश्चितच मिळेल. कारण उत्तर भारतीय अनेक रहिवासी यांचे वास्तव्य येथे असल्याने त्यांना नवीन रेशनकार्ड तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेपासून ते वंचित राहत होते, पण आता नवीन रेशनकार्ड त्यांना लाभल्याने हक्काचे अन्न-धान्य त्यांच्या पदरात पडू शकेल.
नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे यांनी मनोगतात सांगितले की, सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, जनता यांच्या सहकार्याने हे शक्य होऊ झाले. महाराष्ट्र राज्याचे अन्न-धान्य नागरी पुरवठा मंत्री श्री छगनराव भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे व ईतर मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार रेशनकार्ड शिबीर घेण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी काळजी घेतल्याने ह्या शिबिराला यश मिळून हे महत्वाचे सरकारी दस्तऐवज नागरिकांच्या हाती पडू शकले. नागरिकांना काही अडचण आल्यास त्यांनी युगांतर कार्यालयात संपर्क साधावा, असे आव्हान त्यांनी केले. शरद कोकणे, बाळासाहेब दिवे, चंद्रकांत नेवे, सविता भारती, अमित दुबे, रिता तिवारी, सायली ताठे, पोपटलाल लुंकड, उर्वशी चौहान, सलमा शेख, एम सी दिव्याकरण आदीसह ईतर नागरिकांना रेशनकार्ड टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आले. कोविड-१९ चे सर्व नियम, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून कार्यक्रम संपन्न झाला.
एजंट पासून सुटका
वेळ वाचावा यासाठी अनेक नागरिक एजंटाच्या भूल-थापाला बळी पडतात. एजंटाकडून वेगवेगळी कारणे देऊन एका रेशनकार्ड साठी ५००० ते १०,००० रुपये उकळले जातात. एवढी रक्कम देऊनही रेशनकार्ड हाती पडेल याची शाश्वती नसते. तथापि, युगांतर संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या रेशनकार्ड शिबीर मुळे अनेक नागरिकांना रेशनकार्डचा लाभ घेता आला. एजंटगिरी पासून सुटका मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
