मोखाडा| पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील तोरणशेत या गावातील आदिवासी पाड्यावर महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जाऊन रक्षा बंधन साजरे केले. आदिवासीं महिलांना आजच्या रक्षा बंधनाच्या सणानिमित्त भेट वस्तुचे वाटप केले.
त्याप्रसंगी दहिसर विधानसभेच्या आमदार मनिषा चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील ,भाजप अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संतोष चोथे,ज्येष्ठ नेते नरेंद्र पाटील,तालुका अध्यक्ष विठ्ठल पाटील,सहकार प्रकोष संयोजक राजूकाका तुमडे, माजी तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे,शहर अध्यक्ष विलास पाटील,युवा मोर्चा सोशल मीडिया सेल सहसंयोजक दिशांत पाटील ,उमेश एलमामे ,प्रतीक पाघारे,शुभम डिंगोरे,वसंत झिंझुर्डे,हनुमंत पादीर ,अनिल एलमामे,एकनाथ झुगरे,हर्षल बात्रे आदी उपस्थित होते.
