Skip to main content

शिंदे, घोटी टोलनाक्यावरील असुविधा दूर कराव्यात, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

नाशिक| नाशिक - पुणे हायवे व नाशिक मुंबई हायवेवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तसेच शिंदे व घोटी टोलमध्ये असलेली सदोष यंत्रणा याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आलेले आहे. वाहतूकदारांना जर सुविधा मिळत नसतील तर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूकदारासमोर आहे. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येत नाही तोपर्यंत टोल बंद करा अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Transport-Association-demand-on-Union-Minister-Nitin-Gadkari-to-remove-inconvenienceat-Shinde-and-Ghoti-toll-plazas


यावेळी शिंदे टोल येथील व्यवस्थापकांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष जयपाल शर्मा , उपाध्यक्ष बापू टाकाटे, सुभाष जांगडा,उपाध्यक्ष सतीश कलंत्री,अमोल शेळके, पंकज भालेराव, रवि पेहरकर,बाबा शर्मा यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी शिंदे टोलच्या व्यवस्थापकांनी तर ओव्हरलोड वाहनांचा सर्रास वापरा मुळे रोड खराब होत असल्याचे सांगितले.

याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण, अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे,नॅशनल हायवे व्यवस्थापक, टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नाशिक पुणे हायवेवरील शिंदे पळसे व नाशिक मुंबई हायवेवरील घोटी टोल नाक्यावर वाहतुकदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. टोलच्या ठिकाणी असलेली फास्ट टॅगची सुविधा अतिशय कमी वेगवान आणि निष्क्रिय असून याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. परिणामी टोल पास करण्यासाठी वाहतांना वाहनांच्या रांगा लागता अर्धातासाहून अधिक वेळ लागतो. त्यामुळे वाहतुकदारांचे मोठे नुकसान होत आहे.टोल परिसरात क्रेन,रुग्णवाहिका, युटर्नला बत्ती, रोडच्या कडेला सफेद पट्टा,स्वच्छता गृह स्वच्छ नाही याबाबत वारंवार तक्रारी देऊनही यामध्ये कुठल्याही सुधारणा होतांना दिसत नसल्याने वाहतुकदारामध्ये प्रचंड असंतोष असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ज्या शिंदे पळसे व घोटी टोल नाक्यावर टोल घेतला जातो. त्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. याठिकाणी व्यवस्थानाकडून कुठलीही डागडुजी होतांना दिसत नाही. तसेच शासनाच्या नियमावली नुसार आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने सोयी नसलेल्या रस्त्यावर टोल का भरावा असा प्रश्न वाहतूक दारांपुढे आहे. टोलचा दर मात्र वाढवातचं आहे ही एक वासुळीच चालली आहे. वाहन कोणतेही असो त्याचा रोड टॅक्स मात्र आम्ही आगोदरच भरतो आणि नंतर फक्त टोल वसुली. आम्ही टोल द्यायला तयार आहोत मात्र टोल अंकित रोड आणि त्याच्या सर्व सुविधा चागल्या प्रतीच्या द्याव्यात. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम होणार नाही तोपर्यंत टोल घेऊ नये. जर टोल भरण्यास प्रशासनाने बळजबरी केली तर वाहतूकदार व नागरिक रस्तावर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


टोल प्रशासनाने मागितली सात दिवसांची मुदत

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सात दिवसांची मुदत टोल प्रशासनाने मागितली आहे.  याबाबत टोल प्रशासन देखील सकारात्मक आहे. मात्र तरी देखील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले नाही. तर आक्रमक भूमिका घेत कुठलाही वाहतूकदार टोल भरणार नाही.तसेच सदोष अशा फास्ट टॅगच्या यंत्रणेमुळे मालवाहतूक दारांना स्कॅन न झाल्यास आपली वाहने पुन्हा मागे घ्यावी लागतात. यावेळी मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. आज निवेदन देण्यास गेलो असतांना आहे प्रत्यक्ष प्रकार बघायला मिळाला. यावेळी वाहन मागे घेत असतांना अपघात होऊन दोन गाड्यांचे नुकसान झाले. याचा फटका देखील वाहतुकदारांना बसत असल्याने यंत्रणा सुधारण्याची देखील मागणी केलेली आहे.


राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...