नाशिक|प्रतिनिधी| गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम स्तुत्य असून नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
देव द्या, देवपण घ्या ! या उपक्रमांतर्गत गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना मोफत देण्यात येणाऱ्या शर्टचे प्रकाशन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी मांढरे बोलत होते. पोपटी रंगाच्या या शर्टवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाचे नाव व महिती आहे. विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून युवकांची शक्ती विधायक कार्यात सहभागी होत आहे हे कौतुकास्पद असल्याचे देखील जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
प्रास्ताविकात विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची महिती दिली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोकण्यासाठी जनजागृती करणाऱ्या माहितीपत्रकांचे देखील विद्यार्थी कृती समितीच्या वतीने घराघरात वाटप करण्यात आले आहे. देव द्या, देवपण घ्या ! ह्या उपक्रमाची युवकांकडून मोठ्या प्रमाणावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
दिड दिवस व पाच दिवस दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्तींचे संकलनही विद्यार्थी कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून “देव द्या, देवपण घ्या” उपक्रम राबविला जात असून यंदाचे अकरावे वर्ष आहे. या उपक्रमास लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहकार्य मिळत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आकाश पगार, प्रतीक्षा वखरे, स्नेहा आहेर, विशाल गांगुर्डे, रोहित कळंबकर, सागर बाविस्कर, तुषार गायकवाड, राहुल मकवाना, संकेत निमसे, सागर दरेकर, भावेश पवार, मंगेश जाधव, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे प्रकाश चितोडकर, सुशांत पाटील, युवराज कुरकुरे , जयंत सोनवणे, वैष्णवी जोशी, कोमल कुरकुरे, सोनू जाधव, सिद्धांत आमले यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.
सुरक्षिततेला प्राधान्य देऊन उपक्रम सुरू: आकाश पगार
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमांतर्गत मूर्ती संकलित करण्यासाठी सहभाग नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना सुरक्षिततेसाठी मोफत फेस शिल्ड, फेस मास्क, हातमोजे व सॅनिटायझर देण्यात येणार असल्याचे आकाश पगार यांनी यावेळी सांगितले.
फोटो ओळी:- देव द्या, देवपण घ्या ! उपक्रमाच्या शर्टसचे प्रकाशन करतांना जिल्हाधिकारी सुरज मांढरे व विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार. समवेत विशाल गांगुर्डे, रोहित कळंबकर, तुषार गायकवाड, सागर बाविस्कर, राहुल मकवाना, संकेत निमसे, सुशांत पाटील, प्रतीक्षा वखरे, स्नेहा आहेर, सागर दरेकर, भावेश पवार, मंगेश जाधव आदि दिसत आहेत.