Skip to main content

भारत हाच एकमेव आधार

संपूर्ण जगात भारत देशालाच गौरवशाली, शौर्यशाली परंपरा लाभलेली आहे. भारतालाच इतिहासाचे अमूल्य कोंदण लाभलेले आहे. पुरातन काळातील ऋषी-मुनी, संत, महंत, सद्गुरू, परात्पर गुरू यांनीच भारताला घडवले आहे. जिथे प्रभू श्रीरामचे अस्तित्व आहे, तिथेच रावण सारखी प्रवृत्ती असते. कालांतराने या प्रवृत्तीचा नाश होतोच. तीच रावणाची प्रतिकृती (प्रवृत्ती) आज तालिबानने जगाला दाखवून दिली आहे. त्यांचे रोज नवनवीन (एका रात्रीतून) निघणारे 'फतवे' पाहिल्यानंतर जगात 'लोकशाही' हा शब्द तरी अस्तित्वात आहे का ?? असा प्रश्न कोणालाही पडल्यावाचून राहणार नाही. तालिबान म्हणजे 'कट्टर' एका पंथ (धर्म) यांना मानणारा विद्यार्थी, असा साधा सरळ सोपा अर्थ आहे. परंतु तालिबानने 'विद्यार्थी' या शब्दाचा नायनाट करून टाकला आहे. तालिबानचे जे म्होरके आहेत, त्यांनी सरळ महिलांना कुठलेच अधिकार नसून त्यांचे काम केवळ मुले जन्माला घालणे एवढेच आहे, असा अजब फतवा काढून महिलांचेच 'तुष्टीकरण' केले. पण या तालिबानी म्होरक्याना हे देखील कळले नाही, की त्यांनी ही एका महिलेच्या पोटीच जन्म घेतला आहे. अत्यंत क्रूर मानसिकतेचे दर्शन तालिबानी प्रवृत्तीने संपूर्ण जगाला घडवले, असे म्हटले तरी वावगं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण अफगाणिस्तान बंदुकीच्या जोरावर कह्यात घेतला, ते पाहून जागतिक महासत्ता म्हणून 'टेंभा' मिरवणाऱ्या देशांना हे पचनी कसे पडले ??  वास्तविक या देशांना कुठलाच इतिहास नाही. मोठमोठ्या परिषदा भरवायच्या, आणि त्यात केवळ 'पोकळ' भाषणबाजी करायची, असा यांचा ठरलेला कार्यक्रम असतो. ९/११ नंतर जागतिक महासत्तेने आतंकवाद यांचा नायनाट केला. असे आपण सर्वांनी पाहिले (की केवळ दाखवले) आता ते कुठे गेले ? त्यांनी इतक्या सहजासहजी अफगाणिस्तानातून सैन्य माघारी का नेले ? बरं नेले तर नेलं, पण जातांना करोडो रुपयांची शस्त्र-सामुग्री तिथेच का ठेवली ? वीस वर्षे ज्या ठिकाणी सैन्य ठेवून त्यावर अफाट खर्च केला, त्याची आत्ताच का उपरती झाली. वास्तविक या टेम्भा मिरवणाऱ्या देशाचे वागणे म्हणजे 'डबल स्टॅंडर्ड' दोहरा मापदंड किंवा डबल ढोलकी स्वरूपाची आहे. त्यांनी आतंकवादाचे समूळ उच्चाटन केलेच नाही, उलट त्याला खतपाणी घातले, असे म्हणण्यास वाव आहे. जागतिक महासत्तेने  आतंकवादी यांना जेरबंद करण्यासाठी  लाखो रुपयांचे बक्षिसे जाहीर केली, आता तेच आतंकवादी त्यांच्या समोर बसून वाटाघाटी करतील. असे 'अलौकिक' दृश्य लवकरच पाहायला मिळू शकते. जागतिक महासत्तेने 'आतंकवाद' नष्ट करण्याचा केवळ आव आणून त्यापाठीमागून केवळ आपला बदला घेतला.  त्यांना जगाशी काहीही देणेघेणे नाही. संपूर्ण आशिया खंडात केवळ भारतच आतंकवाद समूळ उच्चाटन करू शकतो, याची जाणीव आता या जागतिक महासत्तांना झाली आहे. आतंकवाद विरुद्ध युद्ध सुरू तर केले, पण लगेच पराभूत मानसिकतेत का गेले ? 


केवळ भारतावर आशा

भारत हा अनेक वर्षांपासून परकीय आक्रमणे झेलत आला आहे. त्यातून तो पूर्णपणे निखरला आहे. उभारणी घेतली आहे, असे इतिहासात नोंद आहे. हे केवळ आणि केवळ भारताच्या नशिबी आले आहे. इतर देशांची लायकी नाही. राष्ट्रघातकी विचार पेरणारे या भारतातही भरपूर प्रमाणात सापडतील. अफगाणिस्तान वर तालिबानने कब्जा मिळवला, हे पाहून किंवा एकूण अनेकांच्या मनात उकळ्या फुटल्या असतील. पण सकारात्मक वेळच त्यांना उत्तर देऊन गप्प बसवतो. जेव्हा संपूर्ण भारतावर गुलामगिरीचे कवच निर्माण झाले होते, तेव्हा अशा नैराश्य वातावरणात 'हिंदवी स्वराज्याचे' रणशिंग फुंकले गेले होते. याच हिंदवी स्वराज्यात 'अटकेपार झेंडे' लागले होते. या 'जरी पटक्याची' दहशत संपूर्ण जगाने अनुभवली होती. हाच 'जरी पटका' एके काळी अफगाणिस्तानच्या मुळावर उठला होता. त्याच्या चिवट झुंजीचे दुष्परिणाम अफगाण्यांनी भोगले आहे. 'जरी पटक्याचे' नाव उच्चारले तरी एके काळी त्यांना कापरे भरत होते. आता ही तीच वेळ येऊन ठेपली आहे. विजयाचा वारसा केवळ भारताकडे आहे. त्या विजयाचे तंत्र भारतच्या मातीत उपजतच आहे. सर्व जगाला हतबलतेने ग्रासले आहे. अशा नैराश्यपूर्ण वातावरणात केवळ भारत (हिंदुस्थान)च आशेचा किरण आहे. परिणामी संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या भूमिकेकडे लागले आहे.

साभार: युगांतर युग/लेख


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...