नाशिक| २३ वर्षापासून ही परंपरा अविरत सुरू आहे आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन घरी बनवले आहे. यंदा पुण्यातील ढेपे वाड्याची पारंपरिक आरास साकार केली आहे ७x५ फूट आकारात साकार केला आहे पूर्णपणे पुठ्यामध्ये हा वाडा बनवलेला आहे.
क्लासिक मराठा आर्किटेक्चरला सर्वात विस्तृत आणि समृद्ध स्वरूपात जतन आणि प्रोत्साहन करणे फार गरजेचे आहे.ढेपेवाडा ही एकमेव नवीन रचना आहे जी गेल्या २०० वर्षात मराठा आर्किटेक्चरवर आधारित आहे. गोष्टींना परिप्रेक्ष्यात ठेवण्यासाठी, मराठा वास्तुकलेचा ३५० वर्षांचा इतिहास जवळजवळ १६४१ पासून सुरू होतो.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वाडा संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीस चालना देते. याला अनुसुरून आणि ही संस्कृती जतन व्हावी यासाठी यंदाच्या वर्षी ही आरास साकारलेली आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र(नाना) फड यांचे पुतणे विशाल फड यांनी ही अप्रतिम कलाकृती साकारली आहे, विशाल व वैभव दत्तात्रय फड यांच्याकडून फडांचा राजाच्या माध्यमातून सातपूर अशोकनगर भागात गेल्या २३ वर्षापासून गणेशोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदा ही फडांचा राजा सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.



