नाशिक| इगतपुरी तालुका रास्त भाव दुकानदार संघटनेने रास्त भाव दुकानदारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी इगतपुरीत बैठक आयोजित करण्यात होती. या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या बैठकीत लायसन नूतनीकरण, रास्त भाव दुकानात वाढीव धान्याचा निष्ठांक, मे महिन्यापासून मोफतचे धान्य वाटपाचे कमिशन मिळणे, रास्त भाव दुकानात खराब धान्य प्राप्त न होणे यासह इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच नाशिक जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटनेने हे प्रश्न सोडवण्यासाठी इगतपुरीचे तहसीलदार श्री परमेश्वर कासुळे यांची जिल्हा संघटनेच्या वतीने भेट घेऊन प्रश्न सोडविण्यास मदत करावी अशी विनंती केली. तहसीलदारांनी हे प्रश्न तात्काळ सोडण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी संघटनेच्या वतीने सर्व दुकानदारांना मार्गदर्शन करण्यात आले व दुकानदारांनी संघटनेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी विभागीय अध्यक्ष गणपतराव डोळसे, जिल्हाध्यक्ष निवृत्ति महाराज कापसे, इगतपुरी तालुका अध्यक्ष शशी उबाळे, उपाध्यक्ष अरुण बागडे, सचिव संजय गोवर्धनी, इगतपुरीचे प्रकाश नाटे, त्र्यंबक तालुका अध्यक्ष सागर भगत, सर्व इगतपुरी तालुका रास्त भाव दुकानदार उपस्थित होते. सर्वांनी संघटनेचे आभार मानले.


