भगुर| सालाबादप्रमाणे याही वर्षी बलकवडे कुटुंबीयांकडे श्रीगणेशाचे आगमन झाले आहे, यंदा गणेशाच्या आजुबजूला फुलांची केलेली सजावट लक्ष वेधून घेत आहे. संपुर्ण कुटुंबात भक्तीमय वातावरण दिसत आहे.
गतवर्षी कोविडमुळे खुल्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करता आला नाही, मानवी जीवनावर आलेले संकट टळणे महत्वाचे होते. त्यामुळे नियम पाळून सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे झाले,त्यामुळे बाप्पा कोरोनाचे विघ्न लवकर दूर करेल अशी प्रत्येक गणेश भक्तांची मनोकामना आहे. यंदा सार्वजनिक गणेशोत्सवामुळे घरघुती गणेश बाप्पा बसवण्याला गणेश भक्तांनी पसंती दिली. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही, त्यामुळे घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहे.
आपण सर्व कोविडग्रस्त परिस्थितीतही कोरोनाचे नियम पाळून श्रद्धापूर्वक हा उत्सव साजरा करत आहोत. भगुर येथील बलकवडे कुटुंबीयांनी घरघुती गणेशासमोर फुलांची सजावट असलेली सुंदर आरास साकारली आहे. घरगुती बाप्पा हा घरच्या सदस्या सारखा असतो, त्यामुळे हे दहा दिवस बाळ गोपाळांचे आनंदी आणि उत्साहाने भरलेली असतात. सगळ्यांना सुख, शांती आणि चांगले आरोग्य लाभो असे साकडे ही यावेळी सर्व बलकवडे कुटुंबीयांनी बाप्पाला घातले.

