नाशिक| गतवर्षी आपण सगळ्यांनी कोविडग्रस्त परिस्थितीत ही आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरूच ठेवली आहे. कोरोनाच्या संकटग्रस्त काळांतही जगांत एकीकडे तालिबानी, अमानवी शक्ती थैमान घालत असतांना आपण मात्र आपल्या दैदिप्यमान भारतीय संस्कृतीतील दीपस्तंभ असलेले व्रतवैकल्ये, सणवार व उत्सव कोरोनाचे नियम पाळून श्रद्धापूर्वक साजरे करत आहोत. सालाबादप्रमाणे याही वर्षी आमचेकडे श्रीगणेशाचे व गौरींचे आगमन झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सावजी कुटुंबीय गौरी व गणेशाची स्थापना करत आहेत यंदा ही त्याच्याकडे बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षी जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार गौरी आणि गणेशाच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात दिनांक १२ / १३ / १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत श्रीगौरींच्या दर्शनार्थ व नंतरही १८ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री १० श्रीगणेशाच्या दर्शनार्थ अवश्य यावे असे भाजपाचे नेते लक्ष्मण सावजी, उर्मिला सावजी, नुपूर सावजी, पूर्वा सावजी यांनी आवाहन केले आहे.
