नंदुरबार| नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष दादा नाईक यांनी शिरवे ग्रामस्थांना भेट देऊन गावात स्थापन केलेल्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार शिरीष दादा नाईक यांचे शिरवे ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी स्थानिक समस्या अडचणी जाणून घेतल्या.
याभेटी दरम्यान आमदार साहेबांनी शिरवे गावातील सोयी सुविधांचा आढावा देखील घेतला दरम्यान शिरवे गावात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता, फरशी पुल, गावात व्यायाम शाळेचे निर्माण तरुणांना टी-शर्ट आदी कामे लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर प्राचीन कालीन शिरवे गड किल्ला व देवस्थानाचे सुशोभीकरणासह इतर सुविधा देणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.
गणपती उत्सवा दरम्यान आमदारांनी शिरवे ग्रामस्थांची भेट घेतल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थ एन जी वसावे, राजेंद्र गावित, राजू वळवी, यशवंत वळवी, अनिल गावित, दिनेश वळवी, अरविंद वळवी, लगिनदास वळवी, आनंद वळवी, महेश गावित, गोपीनाथ कोकणी, लालसिंग कोकणी आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


