नाशिक| इंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढतच असून याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभर विविध पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या निषेधार्थ ढोल बजावो सरकार को जगावो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांच्या नेतृत्वात जिल्हयात महागाईच्या निषेधार्थ लाखलगाव, (नाशिक)देवळा, दिंडोरी ,सिन्नर शहर, सिन्नर, ओझर, (निफाड) पिंपळगाव (ब), (निफाड), चांदोरी, (निफाड )आदि तालुक्यांतील ठिकाणी पेट्रोल पंपावर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सर्व तालुका अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनांप्रसंगी सुनिल आहेर, दिंडोरी तालुका अध्यक्ष श्याम हिरे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर योगेश गोसावी युवक विधानसभा अध्यक्ष संदीप भेरे किसान सेलचे तालुकाध्यक्ष छबुराव मटाले भटके-विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद सय्यद पालखेड प्रमुख निलेश गायकवाड निलेश पवार आदी उपस्थित होते.
तसेच या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, उपतालुकाध्यक्ष दिपक जगताप, ठाणगाव यु. गटप्रमुख सोमनाथ डावरे, यु. सरचिटणीस राजू रेवगडे, युवा नेते मच्छिन्द्र कडभाने, यु. उपतालुकाध्यक्ष शरद डगळे, समाधान बोडके, सचिन डावरे, रावसाहेब पवार, सौरभ डावरे, मनोज शिंदे, एकनाथ भांगरे, राजू शिंदे, समाधान कडाळे, अंकुश शिंदे, रामहरी शिंदे, अक्षय भडांगे, अभिजित शिंदे, कृष्णकांत शिंदे, सौरभ शिंदे, दत्ता उगले, रावसाहेब पवार आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष बाळा बनकर,राष्ट्रवादी युवकचे निफाड विधानसभा अध्यक्ष भुषण शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार,भावेश मंडलीक,अजय गायकवाड, धनंजय विधाते, यश बनकर, ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश पीठे, हनुमंत शेखरे, गणेश वारडे, राजेंद्र वाघमारे,संजय गवळी,जयराम वारडे, सोमनाथ कराटे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक युवक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी, जिल्हा उपाध्यक्ष विनायक कांडेकर, ता.उपाध्यक्ष भास्कर राव ढिकले, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कहांडळ, विधानसभा अध्यक्ष तुषार खांडबहाले, विद्यार्थी तालुका अध्यक्ष संदेश टिळे, लिगल सेल ता.तुषार निरगुडे,श.उपाध्यक्ष निखिल भागवत, ता उपाध्यक्ष अनिल पेखळे, सो मि. तालुका अध्यक्ष अक्षय अनवट,ता. चिटणीस संदीप जाधव, विधानसभा उपाध्यक्ष, गोकुळ अनवट, गोकुळ कांडेकर, ता. सचिव रोहित अनवट ,कृष्णा अनवट ,शिवाजी अनवट, प्रवीण अनवट, सागर अनवट, आदेश अनवट, ज्ञानेश्वर अनवट, रोशन अनवट, स्वप्नील अनवट, गणेश अनवट, ओमकार अनवट आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.