भाविकांसाठी मंदिरं खुली: विधानसभा उपाध्यक्ष ना. झिरवाळ यांनी केली संत निवृत्तीनाथ महाराज आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजाअर्चा
नाशिक| राज्यातील महाविकास आघाडीतर्फे आजपासून प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली झाली. त्या अनुषंगाने विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ, आ. हिरामण खोसकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांच्या प्रमुख उपस्थितीत त्र्यंबकेश्वर देवस्थान व संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थान येथे पुजाअर्चा करून भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले.
त्यानंतर दोन्हींही मंदिरात आरती करण्यात आली. पुजेचे साहित्य, हार फुले आदी साहित्यांचे विक्रीची परवानगी देऊन छोट्या व्यवसायकांना दिलासा देण्याचे काम केले जाईल असे यावेळी सांगितले. तसेच ब्रम्हगिरी गंगाद्वार येथे पर्यटकांपैक्षा भाविकांची संख्या अधिक असते. हे लक्ष्यात घेऊन पर्यटन विभागाकडून आकारण्यात येणारा शुल्क वगळ्यासाठी ना.नरहरी झिरवाळ हे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष कैलास मोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष मनोज कान्नव, अरुण मेढे, भिकुशेठ बत्ताशे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विजय गांगुर्डे, अमोल कडलग, लखन लिलके, संतोष पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष राहुल जाधव, मारुती पवार, मोहन भांगरे, दिलीप पवार, योगेश तुंगार, कौस्तुभ कुलकर्णी, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे, बाळू कदम, जितु झोले, दामोदर कडलग, पंढरी कडलग आदी उपस्थित होते.


