सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या मोजक्या संस्थांमध्ये युगांतर सोशल फाउंडेशन हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. २० वर्षापूर्वी लावलेले छोटे वृक्ष आज त्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले ते त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे, विशेष करून उपनगर भागात संस्थेचे कार्य मोठे असून सामाजिक जाण आणि समर्पणाची भावना यामुळे संस्थेने मोठे नावलौकिक प्राप्त केले आहे. यामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रवी पगारे सर आणि प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमाताई रवी पगारे या दांपत्याची कठोर मेहनत आहे. आजही त्याच तळमळीने संवेदनशीलतेने कार्य सुरू आहे. संस्थेने कोरोना महामारी काळातही सामाजिक दायित्व पार पाडले. सामाजिक सेवेचा वसा अंगीकारलेल्या 'युगांतर'ने समाजातील शोषित, पीडित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महामारी काळात हवी ती मदत केली. संकट डोळ्यासमोर असतांना कसली ही पर्वा न करता युगांतरने समाजाच्या प्रत्येक थरातील लोकांना मायेने जवळ केले, पोटाला आधार दिला. समाजाकडून कुठलीच अपेक्षा न ठेवता समाजसेवा कशी असते, याचा वस्तुपाठच युगांतर सोशल फाउंडेशनने घालून दिला.
जगात वर्षभरापूर्वी करोना महामारीने मानवी जीवनावर संकट निर्माण केले. अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेतले. घराबाहेर पडल्यास मृत्यूशी गाठ अशी भयानक परिस्थिती होती. उपनगरात परिसरात काही वेगळी स्थिती नव्हती. हा परिसर तसा कष्टकऱ्यांचा समजला जातो. या महामारीने माणुसकीला आसमंत दाखवले. प्रत्येक माणूस संसर्ग होण्याच्या भीतीने संशयित दृष्टीने पाहत होता. त्यामुळे मदत तर दूरच साक्षात मृत्यूशी गाठ होणार हे माहीत असूनही युगांतरने जिवाची पर्वा न करता गोरगरिबांच्या पोटाची आग शांत केली त्यासाठी रात्रीचा दिवस केला. युगांतरचे संस्थापक रवी पगारे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तथा प्रभाग १६ च्या नगरसेविका सुषमा रवी पगारे यांनी वैद्यकीय मदतीचा हात देऊन अनेक निष्पाप नागरिक आणि लहान मुलांना जीवदान दिले. बंद काळात नागरिकांच्या घरात धान्य पुरवठा करून लोकांची भूक मिटवली.
महामारी काळात नागरिकांनी संशयाला आणि अफवांवर विश्वास न ठेवता कोणती काळजी घ्यावी, कुटुंबातील सदस्य यांना वाचवण्यासाठी काय करायचे यासाठी खास ऑनलाइन शिबिराचे यशस्वी आयोजन केले. गरज पडेल त्याला ऑक्सीजन, व्हेंटिलेटरची मदत केली. परिसरातील जवळपास १६०० कुटुंबांना ७० क्विंटल धान्य वाटप केले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुषमा पगारे यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून उपनगरात निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. मातोश्रीनगर, आनंदनगर, अयोध्यानगर, शांतीपार्क सोसायटी परिसरात केमिकलची फवारणी केली. 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' या नात्याने डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आर्सेनिक गोळ्यांचा पुरवठा सर्व प्रभागात सुरू केला. नगरसेविका पगारे यांनी स्वतः नागरिकांच्या घरोघरी जाऊन थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी केली. युगांतरच्या महिला ब्रिगेडच्या असामान्य कामाची दखल राष्ट्रीय नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांनी पगारे यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. युगांतर ही एक लोकचळवळ आहे, समस्याग्रस्त लोकांना आणि निराधारांना आधार, अशी समाजहिताची कामे मागील २० वर्षांपासूना अखंडपणे सुरू आहेत.
समाजासाठी जसे आपले देणे लागते याच भान जसे त्यांनी कायम ठेवले तसे पर्यावरण संरक्षण ही देखील आपली जबाबदारी आहे, यावर ही त्यांचा गाढ विश्वास आहे. त्यासाठी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कोरोना काळात प्रभाग १६ मधील दिवंगतांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येऊन वृक्षरोपण मोहीम राबविली. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी पगारे (सर) यांच्या उपस्थितीत उपनगर मधील श्रमनगर, शातीपार्क, अक्षरधारा सोसायटी, आनंदनगर आदी भागात वृक्षारोपण करण्यात आले. युगांतर सोशल फाउंडेशनने हा जो उपक्रम प्रभागात सुरू केला, तो निश्चितच वाखण्याजोगा आहे, अशी पाठीवर थाप स्थानिक नागरिकांनी दिली. उपनगर भागात अनेक लोकोपयोगी कामे केली. परिसरात मोफत लसीकरण मोहीम राबविली. नागरिकांच्या लसीकरणासाठी पगारे दांपत्य जातीने हजर राहून सर्वतोपरी सहकार्य करत आहेत.
तसेच परिसरातील गरजू नागरिकांची नवीन रेशनकार्डसाठीची वणवण थांबवून १००० कुटुंबीयांना शासनाच्या माध्यमातून रेशनकार्ड बनवून देत धान्य मिळवून दिले, तसेच मोलमजुरी करणाऱ्या मातांना सांत्विक आहाराचे वाटप केले. कोरोनाची भीती कमी व्हावी म्हणून त्यांचे समुपदेशन करत स्वच्छतेवर भर दिला. तसेच ड्रेनेज, रस्ते, एलईडी लाईट अशा मूलभूत सुविधांवर भर देत प्रभागातील अडीअडचणी दूर केल्या. संकटाच्या काळात मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे संस्थेच्या संवेदनशीलतेचा परिचय होतो.
समाजासाठी जसे आपले देणे लागते अशी जी भावना आहे, तशीच भावना पर्यावरण संरक्षण बाबत ही दिसून आली पर्यावरण संरक्षण देखील आपली जबाबदारी आहे असे मानून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कोरोना काळात प्रभाग १६ मधील दिवंगतांच्या स्मृतींना देण्यासाठी वृक्षरोपण मोहीम राबविली आणि एक समाजोपयोगी उपक्रमाचा पायंडा ही सुरू केला. प्रभाग १६च्या नगरसेविका सौ सुषमा रवि पगारे, युगांतर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री रवी पगारे (सर) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उपनगर मधील श्रमनगर, शातीपार्क, अक्षरधारा सोसायटी, आनंदनगर आदी भागात वृक्षारोपण करण्यात आले. युगांतर सोशल फाउंडेशनने हा उपक्रम प्रभागात सुरू केला, तो निश्चितच वाखण्याजोगा आहे, अशी पाठीवर थाप स्थानिक नागरिकांनी दिली.
नाविनपूर्ण उपक्रम आणि उपनगर भागातील विकासावर त्यांचा विशेष भर आहे. शांतीपार्क- मातोश्रीनगर मॉडेलरोड परिसर कमर्शियल हब म्हणून नावारूपास आला आहे. नागरिकांना सर्वच सुविधा याभागात मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्याचा दृश्य परिणाम ही दिसत असून हा परिसर सुरेख आणि देखणा झाला आहे. त्याचे श्रेय प्रभाग १६ च्या नगरसेविका सौ. सुषमा रवी पगारे यांच्या पाठपुराव्याला आणि मेहनतीला जाते. आता उपनगर मातोश्रीनगर मॉडेलरोड स्थानिक नागरिकांसाठी व्यापार वृद्धीस चलाना देणारा आणि बेरोजगारांना रोजगार देणारा परिसर झाला आहे. संस्थेचे कार्य यावरच थांबत नाही तर युगांतर युवा मंचच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी नोकरी, रोजगार प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील केले जाते. त्यातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
कोरोना काळात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. त्यासाठी युवक, नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले तसेच रक्तदानासाठी प्रोत्साहीत केले. दिवाळीत दरवर्षी युगांतर परिवाराच्या वतीने 'स्वस्त बाजार'च्या माध्यमातून स्वस्त किराणा उपलब्ध करुन सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहे. याचा शेकडोच्या संख्येने नागरिक लाभ घेत असतात.
उपनगर भागात युवकांमध्ये धम्म संस्कार रुजावा यासाठी बुद्ध विहाराची निर्मिती केली आणि समता, बंधुत्व, एकात्मता जोपासण्याचे काम केले. तसेच बालमनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी उपनगर येथील मातोश्रीनगरमध्ये मदर्स पार्कची अभिनव संकल्पना राबविली. हे उद्यान बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. त्यामुळे प्रभागातील सांस्कृतीक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासावर त्याचा अधिक भर दिसून येतो, त्यांच्या याच कार्याची दाखल घेत नगरसेविका सुषमाताई रवी पगारे यांना समाजभूषण पुरस्काराने ही सन्मानित करण्यात आले आहे. साधे सरळ आणि कायम जमिनीशी घट्ट नातं असलेले रवी पगार सर आणि उच्च विद्याविभूषित सौ. सुषमाताई रवी पगारे यांच्याकडून पुढील काळात अधिक चांगले सामाजिक कार्य घडो आणि प्रभागाच्या विकासासाठी आणखी बळ मिळो अशा शुभेच्छा प्रभागातील नागरिकांनी दिल्या आहेत.
सौ. सुषमा रवी पगारे
नगरसेविका, प्रभाग १६
रवी पगारे सर
संस्थापक अध्यक्ष,
युगांतर सोशल फाउंडेशन नाशिक
मो. 9975499599





