जगात १ डिसेंबर जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आपण एच आय व्ही एड्स संबंधी माहिती जाणून घेत आहोत. एचआयव्ही संक्रमण होण्याचे प्रमाण भारतात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांचे 20 सप्टेंबर 2020 च्या संकलित माहितीनुसार जागतिक पातळीवर भारताचा 80 वा क्रमांक लागतो. तर जागतिक पातळीवर एच आय व्ही संक्रमणाच्या यादीत सर्वाधिक एचआयव्ही संक्रमनाने बाधित असणारे देशात अग्रक्रमी दक्षिण आफ्रिका व नायजेरिया या देशांचा समावेश आहे 2019 च्या आकडेवारीनुसार सध्या भारतात 23.49 लाख व्यक्ती एचआयव्हीसह जगणाऱ्या आहेत, यात 15 ते 49 वया मधील 0.22 टक्के व 79 हजार बालके जवळजवळ 3.4 टक्के आहेत. तर 9.94 लाख 44 टक्के महिलांचा समावेश आहे.
भारतात 2019 मधील एचआयव्ही सेंटिनल सर्वेक्षणांमध्ये आढळून आले आहे की 2010 च्या तुलनेत 37 टक्क्यांनी एचआयव्ही संक्रमण होण्याच्या संख्येत घट आली आहे, ही आपल्यासाठी समाधान देणारी बाब आहे तसेच एचआयव्हीसह जगणारे उपचार सातत्य असणारे व्यक्तींच्या मृत्यु दरात ही घट आली आहे. वर्ष 2010 तुलनेत 2019 पर्यंत 66 टक्के पर्यंत मृत्यू प्रमाणात घट आली आहे. सध्याच्या अनुमानित आकडेवारीनुसार भारतात दर हजारी 0.05 व्यक्ती यात 20.52 हजार गरोदर महिला असून यांना उपचार सुरू करणे गरजेचे असेल असे म्हटले आहे.सद्यस्थितीत महाराष्ट्रात एच आय व्ही संक्रमित व उपचार घेणारे 3.96 लाख व्यक्ती असून भारताच्या एकूण संक्रमित व्यक्तीमध्ये महाराष्ट्राचे 0.36 टक्के व्यक्तींचा समावेश आहे. भारतातील संक्रमण दर कमी करण्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालय राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना राज्यस्तरावरील राज्य एड्स नियंत्रण संघटना व प्रत्येक आय सी टी सी समुपदेशन केंद्र जे ग्राउंड लेव्हल वर जाऊन काम करतात असे आमचे समुपदेशक ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी, नोडल ऑफिसर वैद्यकीय अधिकारी ,स्टाफ नर्स ,एन जी ओ यांची महत्त्वाची भूमिका आहे.
भारतात एच आय व्ही एड्स वर उपचार असणारे स्वतंत्र असे एकही शासकीय रुग्णालय नाही परंतु सर्व शासकीय रुग्णालयांमधून एच आय व्ही संक्रमित व्यक्ती व त्याला जडनाऱ्या संधीसाधू आजारावर उपचार करतात. तर संपूर्ण भारतात 2016 पर्यंत 20756 समुपदेशन व चाचणी केंद्र वर तपासणीचे काम केले जाते तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र यावरही एच आय व्ही संक्रमण तपासणी सुविधा सुरू केलेली आहे. तसेच एच आय व्ही संक्रमित रुग्णांना मोफत उपचार व सातत्यपूर्ण उपचार मिळण्यासाठी भारतात 2020 पर्यंत 570 ए आर टी सेंटर व 1264 लिंग ए आर टी सेंटर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुविधा केली गेली आहे यामुळे एचआयव्ही संक्रमित रूग्णांना वेळेत उपचार घेणे शक्य झाले आहे त्याच्या जोडीला जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागृती निर्माण होण्यासाठी एच आय व्ही एड्स विषयी माहिती टेलिव्हिजन वरून माहिती ती स्थानिक पातळीवर समुपदेशन व चाचणी केंद्र विभागातून सरळ समुपदेशन वर्तमानपत्रातून एच आय व्ही विषयी जनजागृती रेड रेबन क्लब मार्फत तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मार्फत याच्या विषयी माहितीचा प्रसार केला जातो तसेच 10 97 हा टोल फ्री क्रमांक वरुण एच आय व्ही विषयी माहिती दिली जाते. आपल्याला एच आय वी संक्रमणावर बऱ्याच प्रमाणात आळा घालण्यात यश आले आहे.
आता थोडेसे एच आय व्ही संक्रमण कसे होते याविषयी थोडक्यात माहिती पाहू एच आय व्हि म्हणजे काय असा प्रश्न मनात निर्माण होतो एच आय व्ही हे ह्यूमन इम्मुनोडेफिसायन्सी व्हायरस चे संक्षिप्त नाव आहे सरळ भाषेत व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू असे म्हणता येईल. तर एड्स इंग्रजी अक्षराप्रमाणे आक्वायर्ड इम्मुनोडेफिसायन्सी सिंड्रोम चे संक्षिप्त रूप आहे याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे संपादित संसर्गापासून रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की व्यक्तीला अनेक प्रकारचे संधीसाधू आजार होतात अशा अवस्थेला एड्स असे म्हणतात. एच आय वी संक्रमणामुळे रुग्णाची रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि अशा रुग्णास अनेक प्रकारची संधीसाधू आजार होतात यावर त्याला वेळेत उपचार मिळाला नाही तर अशा व्यक्तीचा मृत्यू संधीसाधू आजाराने होतो.
एचआयव्ही संक्रमण होण्याची कारणे चार आहेत १) असुरक्षित लैंगिक संबंधातून म्हणजे एक किंवा जास्त व्यक्ती बरोबर असुरक्षित शारीरिक संबंध केल्यामुळे २) एचआयव्ही संक्रमित रक्त किंवा रक्तघटक चढवल्याने ३) दूषित सुया किंवा दूषित ऑपरेशन साहित्य वापराने ४) एचआयव्ही संक्रमित मातेपासून तिच्या होणाऱ्या बाळाला एचआयव्ही संक्रमण होते वरील चार मार्गाने याच्यावर चा प्रसार एकापासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत होतो.
एच आय व्ही व्हायरस चे राहण्याचे ठिकाण काय आहे तर हा विषाणू शरीरात केवळ रक्तात ,वीर्यात, योनी श्राव तसेच काही प्रमाणात आईच्या दुधात असतो व या मार्गानेच तो इतर व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. एचआयव्हीची बाधा झालेली व्यक्ती कशी ओळखता येते असा प्रश्न साहजिकच मनात येतो याचे उत्तर तसे अवघड आहे कारण संसर्गित व्यक्ती 10 वर्षापर्यंत सुद्धा लक्षण विरहित असू शकतो संसर्गित व्यक्तीला एड्स ची लक्षणे संधीसाधू आजाराची लक्षणे निर्माण होण्यास सामान्य तह सहा महिने ते आठ वर्षाचा काळ लागू शकतो सरासरी संसर्ग झालेल्या पैकी पन्नास टक्के व्यक्तींना आठ वर्ष एड्स होण्यास लागू शकतात हे त्या व्यक्तीच्या शारीरिक ठेवण वर आहार-विहार व्यायाम या गोष्टींवर अवलंबून असते. मात्र हा व्यक्ती याच काळात एच आय व्ही चा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरवू शकतो. या व्यक्तीची रक्त तपासणी केल्यावरच त्याला एच आय व्ही बाधा झालेले आहे किंवा नाही हे निदान करता येऊ शकते. हो मात्र संधीसाधू आजाराची लक्षणे एखाद्या व्यक्तीस परत परत येत असल्यास त्याने एच आय व्ही ची तपासणी करून घेतली पाहिजे संधीसाधू आजारांमध्ये सामान्यतः वारंवार होणारे जुलाब, अंगात बारीक सतत चा ताप असणे वारंवार तोंड येणे, त्वचारोग, नागिन, तोंडात व्रण होणे , वजनात अकारण दहा टक्के पर्यंत वजन कमी होणे . फुफ्फुसाचा क्षयरोग होणे, निमोनिया, मस्तिष्क दाह, लसीका ग्रंथी ला सूज येणे इत्यादी आहेत.
एचआयव्ही संक्रमण तपासणी आपण स्वतःहून कमीत कमी सहा महिन्यातून एकदा तरी केली पाहिजे याचाही संक्रमण रक्ततपासणी सर्वच रक्त तपासणी प्रयोगशाळा मध्ये केली जाते परंतु शासकीय रुग्णालयात एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रामध्ये मोफत केली जाते तसेच एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रामध्ये आपण तज्ञ समुपदेशन मार्फत जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता. आपल्या चाचणी चा अहवाल ,आपली सर्व महिती गुप्त ठेवली जाते या मुळे आपण न लाजता,न भिता आपली चाचणी करून घेतली पाहिजे तसेच आपण चाचणी केली असता जर चाचणी अहवाल सकारात्मक आला असेल तर पुढील उपचाराकरिता आपल्याला ए आर टी सेंटरला संदर्भित केले जाते तेथून आपण एच आय व्ही संक्रमण नियंत्रण औषध उपचार अगदी मोफत मिळतो.
ए आर टी म्हणजे ऑंटी रेट्रो व्हायरल थेरपी .ए आर टी सेंटर वर मिळणाऱ्या औषधांना ए आर टी म्हणतात ही औषधे आपल्या शरीरातील एचआयव्ही संक्रमण नियंत्रित करते. औषधातील प्रोटीएज इनहिबीटर मुळे एच आय व्ही संक्रमण वाढ रोखली जाते व काही काळातच उपचार सातत्य ठेवणाऱ्या व्यक्ती पुन्हा पूर्वपदावर येतात पूर्वीसारखीच जीवन क्रिया करू शकतात. अशा व्यक्ती समुपदेशन काच्या सतत संपर्कात राहून आपल्या समस्या वर मात करून आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगतात. समुपदेशकाच्या सल्ल्याने ते आपला प्रापंचिक जीवनाचा आनंद देखील अबाधित ठेवतात.
एचआयव्हीसह जगणाऱ्या व उपचार सातत्य असणाऱ्या रुग्णांना शासनाकडून सुरू असलेल्या विविध शासकीय सहाय्य योजनांचा लाभ होऊ शकतो त्यासाठी एकात्मिक चाचणी व समुपदेशन केंद्रातील समुपदेशक एन जी ओ आपली नेहमी मदत करण्यास तयार असतात . एच आय व्ही संक्रमित व्यक्तींना समाजातून व कुटुंबातून नेहमी साथ व सहकार्य मिळावे यातून ते आपले जीवन आनंदाने जगू शकतात त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक भेदभाव न करता त्यांना साथ आधार देणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे यातूनच आपण एक स्वास्थ्य समाज निर्माण करू शकतो. तसेच एड्स मुक्त भारत घडू शकतो.
श्री शेख आदिल जान मोहम्मद
समुपदेशक,
एकात्मिक चाचणी व समुपदेशन
केंद्र ग्रामीण रुग्णालय पुणतांबा. तालुका राहता जिल्हा अहमदनगर.