नाशिक| बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचा नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शिवस्मारकाला दुग्धाभिषेक करून जाहीर निषेध करण्यात आला.
शिवछत्रपती हे महाराष्ट्रासाठी दैवत आहे, त्यांचे नाव आदराने घेतले जाते. परंतु त्यांच्या अस्मितेला धक्का लागेल असे कृत्य देशात कुठे घडल्यास आम्ही ते कदापी सहन करणार नाही. प्राताध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटद्वारे केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील छत्रपतींच्या पुतळ्यांचा दुग्धाभिषेक करून कर्नाटकातील घटनेचा निषेध नोंदविला.
त्यात चांदवड येथे तालुका युवक अध्यक्ष दत्ता वाघचौरे तसेच नाशिक तालुका अध्यक्ष गणेश गायधनी यांनी कार्यकर्त्यांसह घोषणा देत दुग्धाभिषेक केला. अशी माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.