नाशिक| नाशिकमधून देशात व परदेशात इंडिगो एअरलाइन्सतर्फे विमान सेवा सुरू करण्यात यावी याविषयावर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पद्मश्री बाबुभाई राठी सभागृहात इंडिगो एअरलाइन्सचे सेल्स मॅनेजर गौरव जाजू व मॅनेजर कार्पोरेट सेल्स श्री. शशांक लठू यांच्यासमवेत बैठक झाली. इंडिगो एअरलाइन्सचे मॅनेजर सेल्स श्री. गौरव जाजू व कार्पोरेट सेल्स मॅनेजर शशांक लठू यांनी नाशिकमधून विमानसेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सुरवातीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर देशमुख यांनी स्वागत केले व महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती दिली. नाशिकमधून इंडिगोने देशभर विमानसेवा सुरु करावी. विमानसेवा सुरू करण्यासाठी सर्वसुविधा व पोषक वातावरण असून इंडिगोला चांगला प्रतिसाद मिळेल असे सांगितले. उपस्थित सदस्यांनी नाशिक व उत्तर महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राची माहिती दिली. इंडिगो लवकच नाशिकमधून विविध शहरात विमानसेवा सुरु करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रसंगी सौ. सुनीता फाल्गुने, श्री. संजय सोनवणे, श्री. संजय राठी, श्री. दत्ता भालेराव, श्री. मनिष रावल, श्री. व्हीनस वाणी, श्री. रवी जैन, श्री. राजाराम सांगळे, सहायक सचिव अविनाश पाठक उपस्थित होते