नासिक हे हजारो वर्षांची पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेले नगर आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेले हे शहर प्रगतीत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर आहे तर देशातील सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्या शहरांमध्येही अव्वल स्थानावर आहे. नासिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही प्राचीन आहे. अन्य व्यवसायांबरोबरच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय येथे शतकानुशतके चालू असून पेशवाईत नासिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने इ.स.१७२५ नंतर नासिकची भरभराट झाली. याच काळात सराफी व्यवसायही जोमाने वाढला. परंपरागत सोने दागिण्याबरोबर चांदीच्या भांडीमाल व इतर वस्तुंचे उत्पादनही येथे होऊ लागले. हळूहळू नासिक हे शुद्ध चांदीची बाजारपेठे म्हणून देशभर प्रख्यात झाले आणि नावारूपाला आले. आजमितीला नासिक महानगरपालिका क्षेत्रात लहान मोठी हजाराच्यावर सराफी दुकाने आहेत. सराफ व सुवर्णकारांचे उत्तम सहचर्य हे नासिकच्या सराफ बाजाराचे वैशिष्ट्य आहे. नासिकमधील सर्व स्थानिक सराफ सुवर्णकार व्यावसायिकांचे केंद्र म्हणजे नासिकचा जुना सराफ बाजार होय. बदलत्या युगातही भविष्यकाळातील बदलत्या गरजा ओळखून सुवर्ण व्यावसायिक भावी आव्हानांना तोंड देण्यासाठी सदैव सज्ज आहेत.
नाशिक। प्रतिनिधी: ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची नावे सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे. अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...