- रिपब्लिक डे परेडसाठी आरोग्य विद्यापीठाच्या एनएसएसमधील दोन विद्यार्थ्यांची निवड - TheAnchor

Breaking

December 22, 2021

रिपब्लिक डे परेडसाठी आरोग्य विद्यापीठाच्या एनएसएसमधील दोन विद्यार्थ्यांची निवड

नाशिक| प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककातील दोन स्वंयसेवकांची निवड झाली आहे. विद्यापीठाचे इगतपुरी येथील एस.एम.बी.टी. आयुर्वेद महाविद्यालयाचा पिल्लई फ्रॅन्को प्रिन्स व नाशिक येथील मोतिवाला होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाची कु. सना शेख विद्यार्थ्यांची राजपथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनाकरीता निवड झाली आहे. 
Selection-of-two-students-from-NSS-of-Republic Day-pared-health-univercity

Selection-of-two-students-from-NSS-of-Republic Day-pared-health-univercity

केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालय आणि राज्य शासन यांनी आदेशित केल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पथसंचलन पथकात सहभागी होतात.   या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे दि. 12 ते 21 ऑक्टोबर 2021 कालावधीत पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबीर घेण्यात आले. या शिबीरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहभागी स्वयंमसेवकातून उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करणाÚया राज्यातील आठ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. यामध्ये चार विद्यार्थी व चार विद्यार्थींनींचा समावेश असतो. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील दोन स्वयंसेवकांची राष्ट्रीय पथसंचलन पथकात पहिल्यांदा निवड झाली आहे.

या विद्यार्थ्यांचे लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) अ.वि.से.प., वि.से.प. मा. कुलगुरु, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्र. संचालक तथा राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अॅड. श्री. संदिप कुलकर्णी आणि महाराष्ट्र व गोव्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रिय संचालक    श्री. कार्तिकेयन, राष्ट्रीय सेवा योजने राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रभाकर देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी विद्यार्थी कल्याण विभागातील वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री. बी. आर. पेंढारकर, कक्ष अधिकारी, श्री. के. आर. पाटील, श्री. आबाजी शिंदे, निकेश बागुल, श्रीमती विजया वाणी आदींनी परिश्रम घेतले. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलानात निवड झाल्याबद्दल विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.