नाशिक| प्रतिनिधी| आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कलावती मुरलीधर साळवे (वय६५) यांचे सोमवारी पहाटे ५:३० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले सूना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर अमरधाम येथे दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक मनोज संसारे यांच्या त्या मावशी व ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे यांच्या भगिनी होत. आंबेडकरी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. स्वाभिमानी रिपब्लीकन पक्षाच्या महाराष्ट्र् महिला आघाडीच्या त्या २० वर्षे प्रमुख होत्या. सामाजिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांनी शिवणकाम, नक्षीकाम, बालवाडी कोर्स आदीच्या माध्यमातून अनेक मुलींना स्वावलंबनाचा मार्ग दाखवून सर्वोतोपरी मदत केली. तसेच महिला बचतगट व विविध व्यवसायाला प्रोत्साहन देऊन त्यांनी महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला.
अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्याच्या अंतिम यात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी स्वारिपचे संस्थापक मनोजभाई संसारे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर बर्वे माजी नगरसेवक रमेश जाधव, नगरसेवक राहुल दिवे, जगदीश पवार, पी.के. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली केली. रविवारी दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वा. एल.आय.जी. सोसायटी येथील सुभेदार रामजी सभागृहात जलदान विधीचा कार्यक्रम होणार आहे, असे साळवे परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.