- टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: गणेशगांव प्रिमिअर लीगमध्ये चांदशी संघ विजयी - TheAnchor

Breaking

December 16, 2021

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा: गणेशगांव प्रिमिअर लीगमध्ये चांदशी संघ विजयी

प्रतिनिधी । नाशिक कोरोनाचे संकट कमी होत असल्याने गत वर्षभरापासून रखडून असलेली गणेशगांव प्रिमिअर लीग ही भव्य टेनिसबॅल क्रिकेट स्पर्धा अखेर डिसेंबर महिन्यात उत्साहात पार पडली. चांदशी संघाने न्यू-स्टार हरसूल संघाला पराभूत करत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. तब्बल १० दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेत  महिरावणी-गणेशगाव पंचक्रोशीतील ७४ संघांनी सहभाग नोंदविला होता. 
Tennis-Ball-Cricket-Tournament-Chandshi-team-wins-in-Ganeshgaon-Premier-League
५ डिसेंबर रोजी स्पर्धेला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर संघांनी सहभाग नोंदविल्याने लॉट पध्दतीने सामने खेळविण्यात  आले. स्पर्धेत तब्बल ८ बक्षीसे ठेवण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या आठ संघांना मंगळवारी अंतिम सामना पार पडताच  आयोजक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघ यांच्या उपस्थिती विविध मान्यवरांचे हस्ते रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  गंगा गोदावरी संघ गणेशगाव,  किसन लिलके, मनोज पालखेडे, प्रशांत लिलके, एकनाथ नामिडे  यांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी गणेशगावचे सरपंच  गणपत ठमके, पोलीस पाटील दत्तू लिलके, लहानु कचरे, राजेश महाले, अरुण कनोजे,राजू नामेडे ,बाळासाहेब झोले, समाधान साळवे, ज्ञानेश्वर बेंडकोळी, शंकर लिलके,राहुल काशीद, ज्ञानेश्वर भालेराव,किरण थेटे, गणेश तिदमे, विनायक पडवळ आदींसह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 
८ बक्षीसांचे झाले वितरण  चांदशी संघास ३१ हजाराचे प्रथम पारितोषिक व चषक देऊन राष्ट्रवादीचे नाशिक तालुकाअध्यक्ष निवृत्ती कापसे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 

न्यू स्टार हरसूल संघास द्वितीय पारितोषिक(२१ हजार रुपये)  सोमनाथ बोराडे यांच्या हस्ते 

नायकवाडी संघ-  ११ हजाराचे तृतीय पारितोषिक अर्जुन मधुकर खांडबहाले यांच्या हस्ते, पिंपळपाडा  संघास ७ हजाराचे  चौथे पारितोषिक  रमेश खांडबहाले यांच्या हस्ते, चिरापाली संघास ५ हजाराचे  पाचवे पारितोषिक गणेश गावचे सरपंच तुषार डहाळे यांच्या हस्ते, ठाणापाडा संघास ५ हजाराचे सहावे पारितोषिक अविनाश सोनवणे यांच्या हस्ते, खंबाळे संघास  ५ हजार रुपयांचे सातवे पारितोषिक ढवळू फसाळे यांच्या हस्ते तर आठव्या क्रमांकावरील राजूर बहुला संघास  मोसिन दाजी यांच्या हस्ते  ५ हजार रुपये अन् चषक देऊन गौरविण्यात आले.