..अखेर ड्रग इन्स्पेक्टर पद भरतीत अनुभवाची अट शिथील; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांना यश
मुंबई| राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शासनाकडे केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या जाहिरातीत वयाची अट ३वर्ष शिथील केली आहे.
प्रकाशित केलेल्या दिवसापासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस औषध निर्माण शास्त्र विभागाने प्रदेशाध्यक सुनिलदादा गव्हाणे यांच्या नेतृत्वात मोहीम सुरु केली होती. या अनुषंगाने जाहिरातीत दिलेल्या ३ वर्ष अनुभवाची अट शिथिल करणे संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील आणि सर्व विभागीय उपाध्यक्ष यांनी महाराष्ट्र स्तरावर हा मुद्दा उचलून धरला होता. ही अट शिथिल करावी यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. राजेंद्र शिंगणे, सामान्य प्रशासन विभाग मंत्री मा. दत्तात्रय मामा भरणे यांचेकडे निवेदनामार्फत साकडे घातले होते.
राज्यातील औषध निर्माण शास्त्र विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन, ऑफलाईन मिटिंग सुद्धा घेण्यात आल्या. या सर्व प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आयोगाने ही जाहिरात सद्य स्थितीत स्थगित करण्या चे अधिकृत पत्र काढले आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल सम्पूर्ण राज्यातून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. अमोल पाटील यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.