- रेशनिंग संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकऱ्याना विविध मागण्यांचे निवेदन - TheAnchor

Breaking

December 29, 2021

रेशनिंग संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकऱ्याना विविध मागण्यांचे निवेदन

नाशिक| नाशिक जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने रेशनिंग दुकानदारांच्या विविध अडीअडचणी संदर्भात सोमवारी जिल्हा पुरवठा आधिकारी डॉ अरविंद नरसिकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटनेचे प्रमुख गणपतराव डोळसे पाटील, निवृत्ती महाराज कापसे, दिलीप नवले, सुरगाणा तालुका अध्यक्ष येवाजी भोये, सुरगाणा संघटक भास्कर चौधरी, इगतपुरी तालुका उपाध्यक्ष अरुण बागडे आदी उपस्थित होते.
various-demands-to-the-District-Supply-Officer-of-Ration-Association
जिल्हा पुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनात रेशनिंग संघटनेने केलेल्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. प्रधानमंत्री कल्याण योजनेचे नोव्हेंबर, डिसेंबरचे धान्य इतर उर्वरित तालुक्यांना लवकर प्राप्त करून द्यावे, शासकीय यंत्रणेकडून धान्य दुकानदारांच्या ई-पॉस मशीनवर लवकर अपलोड करावे, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे परवाना नूतनीकरण प्रस्ताव आपल्याकडे प्राप्त झाले आहे ते पडताळणी करून तत्काळ मंजूर करून नूतनीकरण करावे, वारस नोंदी लवकरात लवकर करावी, कोरोना काळात मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी, तसेच जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 दरम्यानच्या पीएमपीकेएवाय योजनेचे पैसे रास्त दुकानदारांच्या खात्यावर जमा करावे अशा मागण्या करण्यात आलेल्या आहे.