औरंगाबाद| नॅशनल दलित मुव्हमेंट फाॅर जस्टीसच्या वतीने देण्यात येणारा राजर्षी शाहू महाराज समाजसेवा पुरस्कार पत्रकार भास्कर निकाळजे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ७ जानेवारी राेजी साेलापूर येथे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत, विद्यापीठ अनुदान अायाेगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डाॅ. सुखदेव थाेरात यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या यशाबद्दल सरपंच दिपक निकाळजे, दिलीप निकाळजे, गजू निकाळजे, आकाश निकाळजे, लक्ष्मण निकाळजे, अनिल निकाळजे, आनंद अंभोरे, सचिन अंभाेरे, राहूल वरशिळ, विशाल पोपळघट आदींनी त्यांचे अभिनंदन केले.