पुणे| अनाथांची माय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७५) यांचे हृदयविकराच्या झटक्याने पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालवली असे सूत्रांनी सांगितले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. तसेच नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यभरात ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. त्यांच्या निधनाने अनाथनाचा आधारवड हरपला असून एका संघर्ष पर्वाचा अंत झाला आहे.
अनाथांचा आधार हरपला: भुजबळ
अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. अतिशय दुःख झाले. सिंधुताई सपकाळ यांच्या आकस्मित निधनाने अनाथांचा आधार हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.