नाशिक|पुणतांबा येथे किसान क्रांतीच्या वतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे. स्थानिक आजी माजी लोकप्रतिनिधी आंदोलनबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसते. राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आंदोलकांना भेट देत असतांना मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी फिरकले नसल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी कांदे व फळ वाटप केले तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी उसाची होळी करत लक्ष वेधले तसेच दूध वाटप करत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने ही आपला प्रतिनिधी पाठवून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शिष्टाईचा प्रयत्न केला पण अयशस्वी ठरला.
आंदोलकांच्या मागण्या पुढीप्रमाणे:
1)कृषी पंपाचे वीजबिल माफी व शेतीला दिवसा पुर्ण दाबाने वीज पुरवठा करावा.
2) राज्यात मोठ्या प्रमाणात ऊस गाळपविना शेतात उभा आहे, त्याला हेक्टरी २ लाख रु. अनुदान व ऊसाच्या घटलेल्या वजनास शेतक-यांना रु. १००० प्रति टन अनुदान मिळावे.
3) उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकलेल्या कांदास उत्पादन खर्चावर आधारित अनुदान द्यावे व कायमस्वरूपी ३००० रु. रास्त दरासाठी ठोस निर्णय घ्यावा.
4) दुधाला ७०:३० या सुत्राप्रमाणे एफआरपी चे कचव द्यावे. फळे व भाजीपाला पिकांचा दरवर्षी सरासरी उत्पादन खर्च काढून त्याच्या किमान
दीडपट बाजारभाव मिळण्यासाठी राज्य कृषीमूल्य आयोगाची स्थापना करून एमएसपी कायदा अमलबजावणी करावी. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतील २ लाखापुढील पात्र शेतक-यांची कर्जमाफी
5) नियमित कर्जधारकांना ५० हजार अनुदान खरीप हंगामापूर्वी द्यावे.
6) केंद्र सरकारच्या शेतमाल आयात-निर्यात धोरणातील शेतकरीविरोधी निर्णयामध्ये बदल करून शेतकरीहिताच्या कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घ्यावा. कांदा साखर, तांदुळ, गहू या शेतमालावरील निर्यातबंदी कायमची उठवावी
7) राज्य कृषी आयोगाची तातडीने स्थापना करावी सोलर कृषीपंपासाठी अटी शर्ती न लावता मागेल त्या शेतक-याता अनुदान मिळावे
8) सॅटेलाइट द्वारे पीक पाहणी यंत्रणा सुरू करावी
9) विद्राव्य खताना रासायनिक खताप्रमाणे अनुदान द्यावे रासायनिक खते, औषधे यावर असलेला अनुक्रमे ५१ व १८५ जी. एस. टी. कर रद्द करण्यात यावा 10) पेरणी ते कापणी पर्यंतची शेती कामे ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत करावी तसेच या योजनेसाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात
11) स्व. गोपीनाथ मुळे शेतकरी अपघात विमा योजनेतील पात्र शेतक-यांना सहज लाभ मिळविण्याकामी सुलभ प्रक्रिया राबवावी व इतर मागण्या
आंदोलन घडामोडी दिवस तिसऱ्या
आंदोलकांनी एक पाऊल पुढे टाकत सकारात्मक भूमिका घ्यावी
पुणतांबा: रहाता तालुक्यतील पुणतांबा येथे किसान क्रांती आयोजित धरणे आंदोलनला सुरवात होऊन तिसरा दिवस उजाडला आज कृषी मंत्री दादा भुसे यांचे दुत बनून आलेल्या रावसाहेब खेवरे यांनी आंदोलकांनी सकारात्मक भूमिका घेऊन एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केलं,आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची शिष्टाई यशस्वी न झाल्याने आंदोलन तिसऱ्या दिवशी सुरू असून मोल मजुरी करणाऱ्या गावातील कुटुंबाला दुधाचे मोफत वाटप करून धरणे आंदोलनास सुरवात झाली. या चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विजय काकडे प्रहार जनशक्ती पक्ष राहाता तालुका युवक अध्यक्ष, आकाश खंडागळे युवक कार्याअध्यक्ष, नाशिक जिल्ह्यातील मांडवड, बागलाण, या गावच्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचे ठराव करून पाठिंबा दिला असून,ज्या दिवशी पुणतांबा कोअर कमिटी जे निर्णय घेतील त्याचा पाठपुरावा कसा करता येईल यासाठी आम्ही करू असे शेतकरी संघर्ष संघटनेचे हंसराज वडगुले यांनी आंदोलकांना सांगितले. तर उपस्थित शेतकऱ्यांसमोर बोलताना रावसाहेब खेवरे अहमदनगर जिल्ह्याचे उत्तर जिल्हा प्रमुख म्हणाले राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे याचे दूत म्हणून तुम्हाला भेटण्यास आलो असून कृषी मंत्र्यांशी आपण फोन वर चर्चा करून चार तारीख दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली असल्याने आंदोलक व सरकार यांच्यातील तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहे. तसेच याबाबत सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक असून लवकरच उर्वरित मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून बैठक आयोजित करू असे आश्वासन दिले. कृषी मंत्री दादा भुसे हे तोडगा करण्यासाठी येणार. असून त्याच्या खात्याशी संबंधित मागण्या व इतर मागण्याचा संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार.असल्याचेही खेवरे यांनी स्पष्ट केले.
पुणतांबा येथे आंदोलनात उसाची होळी
पुणतांबा : किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात शेतक-यांनी उसाची होळी केली.
पुणतांबा ग्रामपंचायत सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. किसान क्रांती, शेतकरी संघर्ष समिती, हंसराज वढगुले, योगेश रायते, विठ्लराव जाधव, बाळासाहेब चव्हाण, मुरलीधर थोरात सुहास वहाडने, सुभाष वहाडने आदीसह शेतकरी उपस्थित होते.