पुणतांबा: राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे एक जूनपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची दाखल राज्य शासनाने घेतली असून चौथ्या दिवशी कृषीमंत्री ना.दादा भुसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कोअर कमिटीच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्यासोबत फोनवर संपर्क करून देत बंद दाराआड तीन तास चर्चा केली. ना. भुसे यांनी शासन तुमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून, ७ जून रोजी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात चर्चेसाठी सदस्यांनी बैठीकला यावे असे निमंत्रण दिले. आंदोलकांनी निमंत्रण स्वीकारुन राज्य शासनाशी चर्चा केल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ग्रामसभा घेऊन ठरवण्यात येईल असे स्पष्ट करून आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय झाला.
यावेळी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा. सदाशिव लोखंडे, रावसाहेब खेवरे, कमलाकर कोते, अनिल बांगरे, सोमनाथ गोऱ्हे, राजाभाऊ झावरे, नितीन अवतडे, शिवाजी साखरे, महेश कुलकर्णी,भास्कर मोटकर, आबासाहेब नळे, तसेच कोअर कमिटीचे सदस्यडॉ.धनंजय धनवटे,धनंजय जाधव ,बाळासाहेब चव्हाण,सुहास वहाडणे,सुभाष कुलकर्णी ,सुभाष वहाडणे ,निकीता जाधव ,अमोल सराळकर, सर्जेराव जाधव ,चंद्रकांत डोखे ,गणेश बनकर ,नामदेव धनवटे ,मुरलीधर थोरात, दत्तात्रय धनवटे ,तसेच विविध विभागाचे अधिकारी गावकरी शेतकरी उपस्थित होते.