- नवरात्रोत्सवाचे वेध: महिला वर्गाकडून गरबारासचा सराव - TheAnchor

Breaking

September 22, 2022

नवरात्रोत्सवाचे वेध: महिला वर्गाकडून गरबारासचा सराव

नाशिक|नवरात्रोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांची  जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे आता उत्सवाचे वेध शहरवासीयांना लागले आहे. या काळात दांडिया रासचा उत्साह काही वेगळाच असतो, त्याअनुषंगाने दांडीया प्रेमींनी ही कंबर कसली आहे, ठिकठिकाणी गरबा रासचा आयोजन होत असल्याने दांडीयाप्रेमी प्रशिक्षण व सराव करतांना दिसत आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी देवीची घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल.
Navratrostav-Practice-of-Garbaras-by-Women

कोविड काळानंतर प्रथमच मोकळेपणाने हा उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळं नवरात्रोत्सवाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे.  नवरात्र म्हणजे ९ दिवस चालणाऱ्या उत्सवाला जोड असते ती दांडियाची यात अबाल वृद्धांपासून सर्वच आनंदाने सहभागी होतात. त्यात महिला वर्गाचा हिरहिरीने सहभाग असतो, गरबा रासला त्यांची विशेष पसंती असते. दांडीया गरबा रास याचे विशेष प्रशिक्षण या काळात घेतले जाते.

शहरातील नृत्यवंदना डॅान्स ॲकॅडमीतर्फे महिला स्पेशल गरबा नृत्य वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. कृषीनगर येथील समाज हॅाल येथे यावेळी ७५ वर्षीय आजीबाईपासून ते ७ वर्षाच्या चिमुकलीचा प्रशिक्षण व सरावात सहभाग दिसून आला. शिक्षिका पल्लवी रविद्र जन्नावार या दरवर्षी गरबाचे क्लास घेतात. पल्लवी या भरतनाट्यम विशारद असून त्यांच्यातर्फे गेल्या १० वर्षापासुन भरतनाट्यमचे वर्ग सिडको व कृषी नगर येथे अविरत सुरू आहे. त्यांच्या वर्गात महिलांचा मोठा सहभाग असतो  त्याअनुषंगाने नवरात्रोत्सवाच्या पर्वासाठी सर्वच वर्गातील महिला उत्साहाने गरबा नृत्याचा आनंद घेतांना या ठिकाणी दिसून आले.