नाशिक| क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवा निमित्त या दिवशी नाशिक शहर व जिल्ह्यात सत्यशोधक समाजाला अभिप्रेत उपक्रम राबविण्यात यावे. तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवीत हे वर्ष साजरे करण्यात यावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी केले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दि.२६ सप्टेंबर रोजी मुंबईत खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाज सेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.योगेश गोसावी, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष संतोष डोमे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, महिला शहराध्यक्ष आशाताई भंदूरे, मोहन शेलार, संतोष खैरनार, विनोद शेलार, योगेश कमोद, नाना पवार, शिवा काळे, गोकुळ बत्तासे, शंकर मोकळ, राजेंद्र जगझाप, रघुनाथ आहेर, साहेबराव शेवाळे, योगेश निसाळ, श्रीराम मंडळ, भालचंद्र भुजबळ, हर्षल खैरनार, अनिल नळे यांच्यासह जिल्ह्यातील समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे म्हणाले की, समाजातील विषमता दूर करण्यासाठी महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या समाजाच्या स्थापनेला दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात यावे. समता परिषद संघटना अधिक मजबूत करण्यासाठी गाव पातळीवर समता परिषदेच्या शाखा निर्माण करण्यात येऊन कार्यकारिणी तयार करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, समाजात असलेला जातीय भेदाभेद, विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचा स्थापना केली. बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. सत्यशोधक समाजाची स्थापन करून त्यांनी प्रत्येक घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न केले. या सत्यशोधक समाजाला आज दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. या समाजाचे विचार आजच्या काळातही अतिशय महत्वाचे असून ते समाजात रुजविण्यासाठी समता सैनिकांनी काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी १५० वर्ष पूर्ण होत आहे. या शतकोत्सवी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास समता सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे व बाळासाहेब कर्डक यांनी केले.
यावेळी जगदीश सोनवणे, पंढरीनाथ बागुल, राजेंद्र भगत, निवृत्ती पवार, विलास दराडे, भारत पवार, मच्छिंद्र पवार, शिवाजी सोनवणे, अजय गायकवाड, चंद्रकांत विधाते, विशाल चव्हाण, संतोष पवार, आकाश विश्वकर्मा, हाजी मोईयोद्दीन शेख, आक्श म्हस्के, हरीश महाजन, दुर्गेश चीत्तोडे, पांडुरंग काकड, किरण भवसेने, सुनील देवरे, विलास वाघ, गणेश खोडे, रवींद्र शिंदे, सागर बेदरकर, सुनील घुगे, संतोष भुजबळ, मुकेश झनके, अॅड.केशव खैरे, नंदकुमार मंडलिक, अनिरुद्ध जाधव, रामराव माळी, ज्ञानेश्वर बुल्हे, रामदास गायकवाड, यशवंत दळवी, सिद्धार्थ भामरे, रवींद्र तारडे, सुभाष जाखेरे, मोहन गवळी, प्रसाद पवार, अमोल भुजबळ, भाऊसाहेब पवार, मेघा दराडे, सरला गायकवाड, आफरीन सैय्यद, माया घोडेराव, रुबिना सैय्यद, माधुरी एखंडे, संगीता पाटील, लता नागरे, संगीता राऊत, अजय बागुल, विशाल म्हस्के, समाधान जाधव, दिलीप माळी, सचिन जगझाप, नितीन आहेर, विजय खोकले, भूषण लाघवे, भाऊसाहेब दिवे, बाबुराव दिवे, कचरू दिवे, नवनाथ दिवे, प्रकाश जाधव, निरंजन शिरसाठ, सागर पाटील, डॉ. रामकृष्ण महाजन, बबन शिंदे, उत्तम नागरे, ज्ञानेश्वर आंधळे, शरद नागरे, अरुण थोरात, निलेश शिंदे, पांडुरंग काकड, मच्छिंद्र माळी, पोपट जेजुरकर, भारत जाधव, दिपक गांगुर्डे यांच्यासह समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.