- महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: मेहबूब शेख - TheAnchor

Breaking

September 20, 2022

महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही: मेहबूब शेख

नाशिक| वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात तीव्र आंदोलन करून उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधातील विविध घोषणानी परिसर दणाणला होता

आंदोलनात यावेळी युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, चेतन कासव, गणेश गायधनी, जगदीश पवार, योगेश निसाळ, विक्रम कोठुळे, पूजा आहेर, कुंदा सहाणे आदि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आपल्या भाषणात म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा सुमारे दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असणारा प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १.५४ लाख हक्काचे रोजगार हिरावले गेले. महाविकासआघाडी सरकारच्या काळात अनेक प्रोजेक्ट राज्यात येणार होते. वेदांता कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेशमध्ये पाहणी केली होती. त्यानंतर सर्व अटींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केले. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव दाभाडे हीच योग्य जागा सांगितली होती. मात्र, ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेल्याने २ लाख लोकांचा रोजगार गेला आहे. यामुळे जनतेमध्ये नाराजी झाल्याने जनता निवडणुकीत यांचा हिशोब चुकता करणार आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात नविन प्रकल्प आणावा अन्यथा राज्य सरकारला स्वस्थ बसू देणार नाही अशा इशारा यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.

याप्रसंगी दिनेश धात्रक, मंगेश लांडगे, भूषण शिंदे, विजय गांगुर्डे, प्रविण बोराडे, संजय पगारे, स्वप्निल कासार, प्रकाश थामेत, अजय बागुल, संजय सोदे, अक्षय खालकर, प्रशांत अरिंगळे, समाधान कोठुळे, जयेश अहिरे, प्रीतेश भदाणे, सचिन ठाकरे, आकाश वराडे, संदीप खैरे, किरण कतोरे, सुनील आहेर, बाळा निगळ, सोनू वायकर, महेश शेळके,सचिन मोगल,सचिन पवार?संदिप गोतरणे?दत्ता वाघचौरे,बापु जगताप,शांताराम झोले,सम्राट काकडे,विशाल डोके, रुपाली पठाडे, नियमात शेख, अक्षय कहांडळ, डॉ संदीप चव्हाण, रूषिकेश पिंगळे,आकाश पिंगळे,प्रकाश थामेत, विजय गांगुर्डे, निखिल भागवत, मुकेश शेवाळे, राहुल कमानकर, अक्षय पाटील, गौतम पगारे, हर्षल चव्हाण, चंद्रकांत साडे, गोरख ढोकणे, किरण पानकर, सुनिल घुगे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.