- एक तरी छंद जोपासावा: चेतन राजापूरकर - TheAnchor

Breaking

October 16, 2022

एक तरी छंद जोपासावा: चेतन राजापूरकर

छंद

मानसिक तणाव दूर करण्यासाठी सध्याच्या स्पर्धात्मक व धावपळीच्या  जीवनशैलीत अनेकदा मानसिक तणाव निर्माण होत असतो आणि हा तणाव आपले मानसिक खच्चीकरण करीत आहेत. मनावरील तणाव हा घटक आपल्या जीवनशैली प्रतिकूल परिणाम करीत असतो तणावामुळे आपली आनंदी जीवन जगण्याची आपली क्षमता कमी होते व आपली एकाग्रता कमी होते.
Cultivate-at-least-one-hobby-Chetan-Rajapurkar
सध्याच्या या स्पर्धात्मक वातावरणात आपण मानसिक तंदुरुस्त असणे जास्त गरजेचे असते अश्यावेळी नैराश्यने व तनावाने ग्रासलेला आपल्या मेंदूला सकारात्मक प्रवाहात आणण्यासाठी सर्वात जास्त उपयोगी पडतो तो म्हणजे आपला छंद  मग तो कुठलाही असो अगदी काहींना आगपेट्यांचे कव्हर तर काहींना रिकाम्या बाटल्यांचे झाकण पोस्टल स्टॅम्प तर काहींना प्राचीन नाणे छंद म्हणजे आपल्या फावल्या वेळात काहीतरी विशिष्ट वस्तू व त्याचे विविध प्रकार जमवतो त्याचा अभ्यास करतो ते करीत असताना मनाला एक वेगळाच आनंद मिळत असतो. त्याला छंद म्हणतात . छंद जोपासणारा व्यक्ती कधीच मानसिक तणावाला बळी पडत नसतो तो त्याच्या छंदात इतका एकरूप झालेला असतो की त्याला तो जगातील सर्व दुःख विसरतो जगण्याचा खरा आनंद घेत असतो 

आजच्या तणावाच्या काळात देखील प्रत्येकाने आपला एक छंद जोपासावा मग तो कुठलाही असो अगदी काहींना गाणे ऐकण्याचा गाणे गुणगुणाचा , नवीन पुस्तके वाचण्याचाही आपला जास्तीत जास्त वेळ या छंद व प्रत्येक छंदाचे शास्त्र असते ते शास्त्र शिकण्यात घालवावा.त्याचा फायदा आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील आपल्याला होतो त्यात आपला छंदच आपली ओळख बनला त्याहून जास्त भाग्य काय म्हणावे मी प्राचीन नाणे जमा करण्याचा छंद आहे मी ठामपणे सांगू शकतो की नाणे संग्रह करणारा व्यक्ती कायम आनंदी आणि तणावमुक्त असतो तो त्याच्या छंदात पूर्णपणे एकरूप झालेला असतो आपला छंदच आपल्याला घडवत असतो आपल्याला आनंदी जीवनाचा रस्ता दाखवत असतो 

नाणकशास्त्र व संधी 

प्रत्येक विषयाचा एक शास्त्र असते . तसेच प्राचीन नाणे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक शास्त्र आहे त्यास नाणकशास्त्र असे म्हटले जाते अलीकडे या विषयाचे अभ्यासक्रम सुद्धा सुरू झालेले आहेत. नाणकशास्त्र क्षेत्राकडे विद्यार्थांचा कल कमी असल्याने या क्षेत्रात करियरच्या चांगल्या संधी उपलब्द आहेत. नाणकशास्त्र अभ्यास क्रम पूर्ण केल्यानंतर पुरातत्व विभाग, ऑक्शन हाऊस इत्यादी संधी मिळू शकते या दृष्टीने देखील विध्यार्थीना बघायला हवे. 

माझा नाणे संग्रह 

मला गेल्या तीस वर्षांपासून प्राचीन नाणे जमविण्याचा छंद आहे.हा छंद मला कसा जडला हे मलाही कळले नाही आमच्या घरात काही प्राचीन नाणे आहेत ते नाणे दिवाळीच्या दिवशी पूजे साठी काढले जायचे त्यामुळे लहान पणापासूनच दिवाळी आणि नाणे बघायला मिळणार याची उत्सुकता असायची त्यातूनच हा छंद जोडला गेला आणि आज हा छंदच माझी ओळख होऊन बसला याचा फार मोठा आनंद होतो . छंद असणारी व्यक्ती कधीही कुठल्याही व्यसनाकडे जाऊ शकत नाही कारण आपल्या छंदाचीच इतकी चांगली नशा असते की तू कुठेही वाईट व्यसनाकडे जाऊच शकत नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना एक तरी छंद जोपासला शिकवले पाहिजे.  

छंद जोपासत असताना आपला सकारात्मक दृष्टिकोन विकास होतो व आपण सकारात्मक विचार करू लागतो. छंद असणारा व्यक्ती खरा जीवनाचा आनंद घेत जगत असतो त्यातून कोणत्याही रोगावर मात करण्याची शक्ती शरीरात तयार होत असते. आताच्या या महामारीच्या काळात प्रत्येकाने एक तरी छंद जोपासून सकारात्मक राहिल्यास नक्कीच आपल्याला कोरोनावर विजय मिळवता येऊ शकतो

                    चेतन राजापूरकर 
    प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक
                       9850111503