Skip to main content

दिवाळीनिमित्त नातेवाईकांच्या भेटीने बंद्यांना मिळतेय बळ

नाशिकरोड|दिपावलीच्या सुट्यांमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांची  गर्दी होत आहे. बाकीच्या वेळी दिवसाला ६० ते ७० नातेवाईक बंद्यांना भेटायला येतात. दिवाळीत हीच संख्य दुप्पट झाली आहे.  आई, वडिल, पत्नी, मुलांशी थोड्या वेळ झालेल्या प्रेमाच्या चर्चेमुळे, त्यांनी दिलेल्या दिवाळ सणांच्या कपड्यांमुळे बंद्याना शिक्षा भोगण्यास, जगण्यास आत्मिक व शारिरीक बळ मिळत आहे. डोळ्यातून गंगा- जमुना वाहिल्यामुळे टेन्शन कमी झाल्याने आरोग्याही ठिक राहात आहे.
Diwali-nimitt-natevaik-bandyna-bhetat-asun-tymule-bandyana-bal-miltay


नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तीन हजारवर बंदी आहेत. त्यात शिक्षा सुनावलेल्या (पक्क्या) आणि खटल्याची सुनावणी सुरु असलेल्या (कच्च्या) बंद्यांचा समावेश आहे. पक्क्या बंद्यांना रोजगार देण्यासाठीसाठी नऊ छोटे कारखाने कारागृहात आहेत.  त्यात बेकरी, सुतारकाम, लोहारकाम, रसायन, मूर्तीकाम, चर्मद्योग, विणकाम आदींचा समावेश आहे.  या व्यतीरिक्त कारागृहाची शंभर एकर शेती आहे.  कारखाने व शेतीत बंद्यांना काम दिले जाते. या कामाबद्दल बंद्यांना कायद्यानुसार वेतन दिले जाते. या बंद्यांना दोन वेळचे भोजन, औषधोपचार, कॅन्टिन, व्यवसाय प्रशिक्षण, शिक्षणसह अनेक सोयी सुविधा दिल्या जातात. बंद्यांना रजाही मिळते.  नातेवाईकांशी फोनवर बोलून ताण कमी करण्यासाठी लॅन्ड लाईन फोनची सुविधा आहे. बंद्यांना ठरावीक दिवसांनी कारागृहाच्या आवारात प्रत्यक्ष पाहून बोलता येते. गळाभेट सारख्या आगळ्या वेगळ्या उपक्रमात नातेवाईकांना बंद्यांची गळाभेटही घेता येते.  


दिवाळीच्या काही दिवस आधी, दिवाळी दरम्यान आणि दिवाळीनंतरही बंद्यांना नवीन कपडे, चप्पल देण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी होते. कपड्यांशिवाय दिवाळी फराळ व अन्य वस्तू देता येत नाही. कारागृहाच्या प्रवेशव्दावरील कक्षात नातेवाईकांची नोंद करून भेटवस्तूंची तपासणी करण्यात येते. शिक्षा सुनावलेल्या पक्क्या कैद्यांना त्याचे नातेवाईक पंधरा दिवसातून एकदा तेही वीस मिनीटे भेटून बोलू शकतात. कारागृहाच्या भेट कक्षात सुरक्षा रक्षकांच्या निगराणीखाली ही भेट होते. नाशिकबरोबरच मुंबई, औरंगाबाद, नगर, धुळे, जळगाव आदी राज्यभरातील जिल्ह्यातील बंदी नाशिकरोड कारागृहात आहेत. त्यांना या जिल्ह्यातून नातेवाईक भेटण्यास येतात. साश्रु नयनांनी निरोप घेऊन परत माघारी फिरतात. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...