- दिव्यांगांनी तयार केलेले साहित्य विक्रीस - TheAnchor

Breaking

October 22, 2022

दिव्यांगांनी तयार केलेले साहित्य विक्रीस

नाशिकरोड|प्रतिनिधी|नाशिकरोड येथील विकास मंदिर मतिमंद शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिवाळी पणत्या व इतर सजावट सहित्य तयार केले आहे. ते उपनगर येथील युगांतर सोशल फाउंडेशनच्या शांतीपार्क कार्यालयात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. विक्रीचा शुभारंभ माजी नगरसेविका सुषमा पगारेयुगांतरचे अध्यक्ष रवि पगारे, विकास मंदिरच्या शिक्षिका घोड़के यांनी केला. नागरिकांनी हे साहित्य खरेदी करून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सुषमा पगारे यांनी केले आहे.

Handicapped-it-Handicapped-items-for-saleems-for-sale-yugantar-foundation