- इगतपुरी-भुसावळ मेमू दि. 18, 19 रोजी रद्द - TheAnchor

Breaking

October 17, 2022

इगतपुरी-भुसावळ मेमू दि. 18, 19 रोजी रद्द

नाशिकरोड| प्रतिनिधी| चाळीसगाव स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे  गाडी क्रमांक 11120 भुसावळ-इगतपुरी मेमू रेल्वेगाडी मंगळवारी (दि.18)  व गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ ही गाडी बुधवारी (दि.19) रद्द करण्यात आली आहे. रेल्वेने ही माहिती दिली आहे. 

Igatpuri-Bhusawal-memu-dt-Canceled-on-18th-19th

मुंबईला जाणा-या पुढील गाड्या रेग्युलेट करण्यात आल्या आहेत. 11078 (जम्मू तावी-पुणे) वाघळी स्टेशनवर 08.15 ते 11.25  पर्यंत. 12142 पाटलीपुत्र-एलटीटी कजगाव स्टेशनवर 08.30 ते 11.25 पर्यंत, 15065 (गोरखपूर-पनवेल) गालन स्टेशनवर 08.40 ते 11.25 पर्यंत, 11056 गोरखपूर-एलटीटी पाचोरा स्टेशनवर 08.45 ते 11.25 पर्यंत, 12780 निजामुद्दीन - वास्को माहेजी स्टेशनवर 09.50 ते 11.25 पर्यंत १५०१८ गोरखपूर-एलटीटी शिरसोली स्थानकावर १०.२५ ते ११.२५ पर्यंत, 15646 गुहाटी-एलटीटी जळगाव स्टेशनवर 10.40 ते 11.25 पर्यंत.