नाशिक| जिल्हयाच्या निर्मितीस यंदा १५१ वर्ष पुर्ण होत आहे. यानिमित्ताने यंदाचे वर्ष हे जिल्हयाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. नाशिकच्या या अभुतपूर्व वाटचालीचा गौरवशाली इतिहास पुन्हा एकदा उलगडवून सांगतानाच तो सर्वांसमोर यावा याकरीता नाशिक न्यूजच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या यानिमित्ताने (दि. २१) रोजी आयोजीत या सोहळयात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, युवराज संभाजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने नाशिकच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणार्या मान्यवरांना नाशिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्हा निर्मितीची १५१ वर्ष आणि जनसामांन्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार्या नाशिक न्यूज या वृत्त वाहिनीचा ११ वर्धापनदिन असा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. जिल्हयाने इतिहास, भूगोल, शास्त्र, भाषा, कृषी, उद्योग,व्यापार या सर्वच विषयांत वास्तविकतेत आपला स्वतःचा उच्चतम दर्जा निर्माण करून एक वेगळे उदाहरण जिल्ह्याच्या रुपाने जगासमोर उभे आहे. प्रभू रामचंद्रांपासून ते ब्रिटिश शासनापर्यंतचा इतिहास, साहित्याचे मेरूमणी असलेले कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांसारख्या प्रभुती, संगीताची परिभाषा निश्चित करणारे पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, बॉलिवूडचा पाया घालणारे दादासाहेब फाळके, देश रक्षणासाठी अहर्निश सेवेत असलेले आर्टिलरी सेंटर आणि नोटांचा कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पाऊलखुणा अशा अनेक वैशिष्ठ्यांचा यानिमित्ताने उल्लेख करता येईल. जिल्ह्याने प्रगतीचे अनेक टप्पे अनुभवले आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते जगासमोर आणताना नाशिकचे ब्रँडिंगही होणे गरजेचे आहे. हवामान, संस्कृती, कला, क्रीडा, संगीत, साहित्य अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. नाशिक न्यूजच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही ओळख अधिक प्रभावीपणे देशपातळीवर पोहोचविण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नाशिक १५१ हा केवळ उत्सव नसून नाशिकच्या पुढील वाटचालीची पायाभरणी ‘नाशिक न्यूज’च्या माध्यमातून या कार्यक्रमाव्दारे करण्यात येणार आहे.
शनिवार (दि. २१) रोजी दुपारी १२ वाजता कालिदास कला मंदिर येथे आयोजीत या सोहळयानिमित्त राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, जिल्हयाचे पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आ.सुहास कांदे, आ. देवयानी फरांदे, आ. अॅड. राहूल ढिकले, आ. सिमा हिरे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रविंद्र सपकाळ, मनसे नेते सलिम शेख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नाशिकच्या या ऐतिहासिक वाटचालीचे साक्षीदार व्हा असे आवाहन नाशिक न्यूजचे मुख्य संपादक लक्ष्मण घाटोळ, संचालक श्रीकांत सोनवणे, दिपाली घाटोळ पाटील यांनी केले आहे.
*यांचा होणार सन्मान*
केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (राजकीय), मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे (विधीज्ञ), नाशिक फ्लॉवर पार्क आणि शुभम वॉटर पार्कचे संचालक शशिकांत जाधव (पर्यावरण) , अँटी करप्शन विभागाचे अधिक्षक सुनिल कडासने (पोलिस प्रशासन), रूंग्टा गुपचे अध्यक्ष ललित रूंग्टा (बांधकाम), आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक लीना बनसोड (प्रशासकीय), मयुर अलंकारचे संचालक राजेंद्र शहाणे (व्यापार), वैद्यकिय अधिक्षक डॉ. आवेश पलोड (वैद्यकिय), ईशा पब्लिसिटीचे सीईओ प्रविण मराठे (उद्योग), साने गुरूजी शिक्षण संस्था शैक्षणिक, प्रयोगशील शेतकरी शिवाजी ढोले (शेती).