रेशन सर्व्हर समस्या: शासनाकडून रेशन दुकानांना भेटी देण्याचे तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्देश
नाशिक| सर्व्हरच्या अडचणीमुळे ईपॉस मशिनद्वारे धान्य वितरणात बाधा उत्पन्न होत असल्याने शिधापत्रिका धारकांना ताटकळत उभे राहावे लागत होते, अखेर शासनाने सर्व्हरमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची दाखल घेत अधिकाऱ्यांना स्वस्त दुकांनाना भेटी देऊन त्याबाबत अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान याबाबत उपसचिव यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना 29 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत स्वस्त धान्य दुकानांना भेटी देऊन तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहे.
तसेच रेशन संघटनेने (nic) 'एनआयशी' सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली असता त्यांच्याकडून 3 जी नेटवर्क वरून 5 जी नेटवर्कवर कनेक्टव्हिटी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे असे, महाराष्ट्र फेडरेशनचे राज्यध्यक्ष गणपत डोळस पाटील व सचिव बाबुराव म्हमाने यांनी सांगितले असून आम्ही एनआयसीशी संपर्कात असल्याचे सांगितले. तसेच राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या अडचणींबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे डोळस व म्हमाने यांनी स्पष्ट केले.
धान्य वितरणास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 ची धान्य वितरणाची मुदत ही 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवून मिळावी याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी. जेणे करून शिधापत्रिका धारकांची गैरसोय होणार नाही अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.
निवृत्ती कापसे
नाशिक जिल्हाध्यक्ष,
रेशन दुकानदार फेडरेशन


