नाशिक| प्रतिनिधी| सर्व्हर डाऊन असल्याने रेशन धान्य दुकानदारांकडून शिधा किट वाटपात अडचणी येत आहे. सर्व्हर नॉट फाऊंड अशा प्रकारचा मशिनवर संदेश येत असल्याने दुकानदार हैराण झाले आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना तिष्ठत उभे राहावे लागत आहे. शहरी भागात काही ठिकाणी वाटप सुरू आहे, मात्र ग्रामीण भागात वितरणात अडथळे येत आहे. शासनाने ऑफलाईन देण्याची घोषणा केली मात्र रेशन संघटनेने त्यास नकार देत सर्व्हरमध्ये सुधारणा करून नियमाप्रमाणे ऑनलाईन वाटप ठेवा अशी विनंती केली.
राज्य शासनाने नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी किटची घोषणा केली. अंत्योदय आणि केसरी शिधापत्रिका धारकांना तेल, चनाडाळ साखर आणि रवा असे शिधा किट देण्याचा निर्णय घेतला. काही ठिकाणी शिधा पोहचल्या तर काही ठिकाणी प्रतिक्षा केली जात आहे. काही शहरी भागात किट वाटप सुरू आहे, तर ग्रामीण भागात नागरिकांना कीटची प्रतिक्षा आहे. त्यात थम मशिनवर सर्व्हर डाऊन असल्याचा मेसेज दिसत आहे. त्यामुळे शिधा वितरणात अडचणी येत आहे. त्यामुळे शिधापत्रिका धारकांना रेशनिंग दुकानाबाहेर रांगेत तिष्ठत उभे राहावे लागत आहे.
शासनाने सर्व्हरमध्ये सुधारणा करावी
आजही संपूर्ण महाराष्ट्रात सर्व्हर डाऊन आहे, मुख्यमंत्र्यांनी ऑफलाईनची घोषणा केलेली आहे. परंतु आम्हाला ते नको आहे. सर्व काम ऑनलाईन झाले पाहिजे. म्हणून सर्व्हरमध्ये सुधारणा करावी कारण ऑफलाइन वाटप केल्यास पुन्हा दुकानदारांवर शंका घेतली जाईल. उशीरा का होईन नियमाप्रमाणे ऑनलाईन वाटप व्हावे. त्यासाठी ऑनलाईनमध्ये सुधारणा करावी.
निवृत्ती कापसे,
नाशिक जिल्हा अध्यक्ष



