नाशिक| ऑल महाराष्ट्र फेअर फ्राईज शॉपकीपर फेडरेशन पुणे यांची राज्यातील रास्त भाव दुकानदार यांच्या विविध अडीअडचणी संदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांच्या सोबत मंत्रालयात दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११:३० वा. बैठक होणार आहे. बैठकीला राज्यध्यक्ष गणपत डोळसे पाटील यांच्यासह ५ प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहे, अशी माहिती राज्य उपाध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी दिली आहे.
कापसे म्हणाले की, या महिन्यातील धान्य अजूनही मिळाले नाही, त्यातच आनंदाचा शिधा अजून बऱ्याच दुकानदारांना प्राप्त नाही. मशीनला येणारी (नेटवर्क) अडचण यामुळे मागील महिन्याचे धान्य प्राप्त होऊन वितरणात आलेली बाधा. तसेच मागच्या व या महिन्याचे धान्याला मुदतवाढ मिळावी या व इतर मागण्यांसंदर्भात प्रधान सचिव यांच्या समवेत मंत्रालयात बुधवार दि. २ नोहेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता बैठक होणार आहे. अशी माहिती नाशिक जिल्हा अध्यक्ष तथा राज्य उपाध्यक्ष निवृत्ती महाराज कापसे यांनी दिली.
