Skip to main content

टाटा एअरबसचा प्रकल्प ही गुजरातला

मुंबई| वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकलपानंतर एअरबसचा सयुक्तिक सी-२९५ (एमडब्लू) वायुसेनेसाठीच्या मालवाहू विमानाचा २२ हजार कोटींचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे,हा प्रकल्प मिहानमध्ये होणार असल्याची चर्चा होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले असून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातच्या बडोदा येथे गेल्यामुळे सरकारचे हे अपयश आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे, मात्र राज्याच्या उद्धोग मंत्र्यांनी हा प्रकल्प यापूर्वीच्या सरकारच्या काळातच निर्णय झाला असल्याचे सांगून आरोप फेटाळले.
Tata-Airbus-c295-transport-aircraft-project-to-Gujarat
स्पेनची कंपनी एअरबस आणि टाटा हे संयुक्तिकपणे सी-२९५ हा वायुसेनेसाठी मालवाहू विमान बनविण्याचा प्रकल्प भारतात सुरू करत आहे.त्यामध्ये ५६ मालवाहू विमाने बनविण्यात येणार आहे. त्यापैकी १६ विमाने एअरबस तयार स्थितीत देणार असून उर्वरित ४० विमानांची बांधणी गुजरात मधील  बडोदा येथील प्रकल्पात करण्यात येणार आहे. यामुळे सुमारे साडेतीन हजार युवकांना नोकऱ्या मिळणार आहे. मिहान येथे हा प्रकल्प होणार असल्याची चर्चा होती. परंतु ३० ऑक्टबरला पंतप्रधानाच्या हस्ते त्याचे गुजरात येथे उद्घाटन होणार आहे. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारून सरकारचे हे अपयश असल्याचा आरोप केला आहे. एका मागून एक प्रकल्प गुजरातला जात असल्याने विरोधक आक्रमक झाले आहे.  उद्धोगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पाचा निर्णय यापूर्वीच्या सरकारच्या काळात झाला असल्याचे सांगून विरोधकांचे आरोप फेटाळले.


महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार गुजरातला मिळणार 

२० बिलियन डॉलरच्या वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पानंतर २२ हजार कोटींचा टाटा एअरबसचा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. शिंदे फडणवीस सरकारचे हे मोठे अपयश असून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हजारो युवकांना मिळणारा रोजगार गुजरात येथे हलविण्यात आला आहे, याचा आम्ही निषेध करत आहे.

पुरूषोत्तम कडलग 
कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...