नाशिक|सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित विद्या प्रबोधिनी प्रशाला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा परिचय शाळेच्या संस्कृत शिक्षिका सौ. स्मिता जोशी यांनी करून दिला कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली सक्सेना, उपमुख्यध्यापिका नायडू , पर्यवेक्षिका प्रियंका भट, श्री. दुसाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी फिल्म चे सादरीकरण करण्यात आले.
या डॉक्युमेंटरीत शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली सक्सेना, सौ. स्मिता जोशी, सौ कोमल मसरणी, सौ प्रियांका शेळके आणि सौ नेहा लोणीकर, सौ. दलाल, सौ. वनिता महाजन यांचे सहकार्य लाभले.

