नाशिक| वडाळी भोई येथे जयश्री राम ज्येष्ठ नागरिक संघ व श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं मोफ़त हृद्यरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. २०० हून अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ कुणाल निकम यांनी उपस्थित नागरिकांना आहार, विहार व व्यायामचे महत्व पटवून देत मार्गदर्शन केले. या प्रसंगी डॉ अखिल पवार (एम डी), डॉ शिद्धार्थ जेउघाले (एम डी), डॉ शैलेश बडवर (एम डी), राहुल वाजे, नितिन पाटील व जेष्ठ नागिरक संघाचे सभासद डॉ. एन डी आहेर, नानाभाऊ आहेर, अर्जून बाबा, निवृत्ती आहेर, शिंदे बाबा, बाळासाहेब जाधव, जयराम जाधव, पूंजाराम जाधव व ग्रामस्त उपस्थित होते.
या शिबिरात रुग्णांची रक्त शर्करा, ब्लड प्रेशर, कार्डियोग्राम (ई.सी.जी) तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व गरजे नुसार मेडिसिन मोफ़त देण्यात आले. बऱ्याच रुग्णांना मधुमेह (डायबेडिस) व उच्च रक्तदाब असल्याचे तपासणी केल्यावर समजले. निदान करुन डॉ कुणाल निकम व सहकाऱ्यांनी मार्गदर्शन व औषधोपचार सुरू केला. हे शिबिर घेण्याचा उद्देश्य सफल झाल्याचं गावचे नागरिक शिबीराचे आयोजक श्री संतोष नानाभाऊ आहेर यांनी समाधान व्यक्त केलं. प्रसिध्द ह्रदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या सोबत चर्चा करुण दरवर्षी शिबिर घेण्याची विनंती केली, डॉ धर्माधिकारी त्याला तात्काळ मान्यता दिली.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कैलास जाधव, अशोक आहेर, ज्ञानेश्वर शिंदे, सागर आहेर, शंकर जाधव, सचिन जाधव ,वैनतेय आहेर, कल्पेश वाळके, सचिन चव्हाण, विनोद भदाने व जय श्रीराम जेष्ठ नागरिक संघाचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच सकाळचे पत्रकार धनंजय वावधन यांचेही महत्वाचे योगदान लाभले.
