Skip to main content

समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोग निदान त्रिसूत्री महत्वाची: भगत सिंह कोश्यारी

नाशिक| समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोगनिदान त्रिसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब व कॅन्सर रिसर्च सेंटरचे उद्घाटन, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान  करण्यात आले व ‘मानस’ अँप प्रारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. 
Triad-of-health-education-research-and-diagnosis-important-for-society-Bhagat-Singh-Koshyari
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यपाल यांच्या समवेत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण आणि संशोधन या पायाभूत संकल्पना आहेत. विविध रोग व त्यावर उपचार शोधण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. संशोधन ही तपस्या आहे. विद्यापीठाच्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून विविध चाचण्या होणार असून त्याचा समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. कॅन्सर आजारावर अन्य पध्दतीत उपचार करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. दूर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती व प्रसार होणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. 

ते पुढे म्हणाले की, आरोग्य शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार होणे गरजेचे आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे. विद्यापीठाने सुरु केलेल्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून संशोधनाला बळ मिळणार असून त्याचा विस्तार होणे क्रमप्राप्त आहे. मूलभूत संशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहचण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगीतले की, विद्यापीठाकडून सुरु करण्यात आलेल्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून विविध संशोधन व उपक्रमांना चालना मिळणार आहे. या लॅबच्या कार्यासह टेलिमेडिसिन उपचार तसेच कॅन्सरसाठी विशेष संशोधन आरोग्य क्षेत्रात संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. जेनेटिक मॉलेक्युल संदर्भात अभ्यासक्रम व संशोधनाला चालना मिळावी याकरीता विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबमध्ये हे प्रामुख्याने कर्करोगाची क्लोनल आणि उपचारात्मक पध्दतीसाठी आवश्यक तपासणी करण्यात येतील. तसेच कर्करोगावर संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे फेलोशिप इन क्लिनीकल अँड लॅबोरटरी जेनेटिक्स यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.  तसेच जेनेटिक डाग्नॉस्टिक विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी तसेच विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. फडके यांनी ऑडियो संदेशाव्दारे जेनेटिक लॅबचे उद्घाटन व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. विद्यापीठाचे संशोधन हे समाजोपयोगी ठरणारे असल्याचे त्यांनी सांगितले.


आरोग्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकरीता मानसिक आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ’मानस’ अँपचा शुभारंभ मा. राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. व नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले. सामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ’मानस’ अँप विकसीत करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आरोग्य विषयक जनजागृती करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. यासाठी ’मानस’ अँप भूमिका महत्वपूर्ण असणार आहे अशी माहिती केंद्र शासनाच्या प्रिंसिपल सायंन्टीफिक अडव्हयझार व्हायझर कार्यालयाच्या संशोधिका डॉ. केतकी बापट यांनी दिली.
  
कार्यक्रमात उपस्थितांचे आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी मानले व पुणे विभागीय रिजनल सेंटरच्या पुढील उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.  

आरोग्य विद्यापीठ आणि नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) यांचा सामंजस्य करारातंर्गत संशोधनाविषयी क्षमता वाढवणे, प्रयोगशाळा सेवा आणि औषध प्रतिकार अभ्यास आदी क्षेत्रांत कार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातून सामर्थ्य प्राप्त करते हे मुख्य उद्दिष्ट आहे. संशोधन उपक्रमांना तज्ज्ञ सल्लागार मार्गदर्शन करतील तसेच विविध विषयांतील नामवंत शास्त्रज्ञांचा समावेश यामध्ये असणार आहे. नवीन संकल्पनेपासून ते अंमलबजावणी आणि निकालांच्या अंतिम प्रसारापर्यंत एकत्रित सहभाग यात असणार असल्याने हा सामंजस्य शैक्षणिक व संशोधन क्षेत्रासाठी करार महत्वपूर्ण आहे

आरोग्य विद्यापीठ आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS) यांचा सामंजस्य करारातंर्गत कर्करोग, चयापचय विकार, संसर्गजन्य रोग आणि औषध यासारख्या महत्त्वाच्या आरोग्य समस्यांवर संशोधन करण्यात येणार आहे.  विद्यापीठासमवेत सामंजस्य करारातून संशोधन उपक्रमास चालना मिळेल.

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, भारतीय औषध संशोधन संस्थेचे पदाधिकारी श्री. अक्कलकोटकर, डॉ. जेठाळे, डॉ. शेंडे,    डॉ. काळे, डॉ. घनःशाम मर्दा, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. सुरेश पाटणकर, कॅन्सर जेनेटिक रिसर्चच्या चेअर प्रोफेसर डॉ. अनुराधा चौगुले, श्रीमती एकबोटे, डॉ. वाणी, डॉ. कल्पना श्रीवास्तव, डॉ. शिला गोडबोले, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही.कळसकर, ब्रिग. डॉ. सुबोध मुळगुंद, अॅड. संदीप कुलकर्णी, विविध परिषदेचे सदस्य, व विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...